तुषार गोसावी : भारतीय संविधानाचे शिल्पकार, स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री, संशोधक, पत्रकार समाज सुधारक, तत्वज्ञानी साहित्याचे अभ्यासक म्हणून जगभरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखले जाते. 6 डिसेंबर 1956 ला वयाच्या 63 व्य़ा वर्षी या महामानवाची प्राण ज्योत मावळली. त्यांच्या स्मृतीस वंदन करण्यासाठी संपूर्ण देशात 6 डिसेंबर हा दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून पाळला जातो. याच महापरिनिर्वाण दिनानिमित्त स्टार प्रवाह वाहिनीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्य़ा जीवनावर आधारीत मालिकेत बाबासाहेबांची किशोरवयीन भूमिका साकारणाऱ्या अभिनेता संकेत कोर्लेकर यांच्याशी बातमीदारने खास बातचीत केलीय. यावेळी त्यांनी बाबासाहेबा बद्दलचे मत व भूमिका साकारताना आलेला अनुभव सांगितला.
- महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका साकारल्यानंतर तुमचे काय मत आहे ?
बाबासाहेबांबद्द्ल सांगायच झाल तर त्यांच्या नावाआधीच ‘महामानव’ हे विशेषण लागत. त्यामुळे अधिक काही सांगायची गरज वाटत नाही तरी मी जोपर्यंत या पृथ्वी तलावर आहे, तो पर्यंत या घटनेच्या शिल्पकाराबद्द्ल, क्रांतीसुर्याबद्द्ल माझ्या मनात आदर आणि प्रेम सदैव कायम राहिल.
- टिव्ही मालिकेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन प्रवास मांडताना तुम्ही किशोरवयीन भूमिका साकारलीत? एकंदरीत तो अनुभव कसा होता?
अनुभव खरच खुप सुंदर होता. जेंव्हा ही भूमिका माझ्याकडे आली त्यावेळी या जगात माझ्या इतका आनंदी माणूस कोणीच नसे़ल अशी माझी त्यावेळची भावना होती. एक कलाकार म्हणून प्रत्येक जण एका अशा भूमिकेच्या शोधत असतोच, जी भूमिका त्याला स्वत:ची वेगळी अशी ओळख देईल. तसेच मरेपर्यंत त्या भूमिकेच्या नावाने ओळख मिळेल आणि ती भूमिका म्हणजे माझासाठी ही बाबासाहेबांची भूमिका होती.
- ऐतिहासिक भूमिका होती ? कशा प्रकारच दडपण होत.
खर तर मला केवळ एक दिवस आधी कळाल मला उद्या बाबसाहेबांची भूमिका साकारण्यासाठी जायच आहे. केवळ एका रात्रीत महामानवाच्या भूमिकेचा अभ्यास करण्यासाठीचा वेळ होता. मात्र मी साकारणारी भूमिका हि तरुण वयातील असल्याने त्या बद्दल इंटरनेट किंवा युट्युबवर जास्त माहिती नव्हती. त्यामुळे थोडस दडपण होतच मात्र ज्यांनी माझ नाव या भूमिकेसाठी सुचवल त्या नरेंद्र मुधोळकर, दिग्दर्शक गणेश रासणे, दशमी क्रिएशन यांच्या मोलाच्या मार्गदर्शनामुळे माझ दडपण दोन दिवसात गेले. त्यानंतर ती भूमिका पडद्यावर उतरली, जी सगळ्यांनीच बघितली. सेटवरील सगळ्यांचीच मोलाची साथ मिळाल्याने एक खुप सुंदुर अनुभव मिळाला.
- बाबासाहेबांची भूमिका साकारताना काय शिकायला मिळाल ? त्यांची अशी कुठली गोष्ट स्वत;मध्ये आत्मसात केली आहेस ?
शिकायला खरच खुप काही मिळाल. इतकी मोठी भूमिका साकारयला मिळाली हे भाग्य़ होतच, पण जे आम्ही साकारत होतो त्या सगळ्याच घटना वास्तवात घडलेल्या आहेत. त्यामुळे ते खरे प्रसंग अभिनयातुन लोकांसमोर मांडताना अक्षरशा अंगावर काटे यायचे आणि ते सगळ साकारताना एनर्जी मिळत होती. पण त्यातल्या त्यात मला अस वाटत आपण जे काही दिवसाचे 8-9 तास काम करतो ते काम प्रमाणिक पणे करावे. तेच मी लोकांना ही सांगेन की तुम्ही ही बाबासाहेबांसारखे एखादी गोष्ट करण्यासाठी पेटुन उठा.
- बाबासाहेबांची भुमिका साकारताना अर्थात अभ्यास केला असणार, त्यांच्या जीवनाचे कोणते वेगळे पैलु तुम्हाला सापडले.
अशा बऱ्याच गोष्टी आहेत, बाबासाहेबांनी नेपोलियनच एक पुस्तक खरेदी करण्यासाठी रेल्वे ने प्रवास करताना चालत जातानाचा एक सिक्वेन्स होता. हा सिक्वेन्स बघुन लोकांनी मला नेपोलियनच्या पुस्तकासोबतचे फोटो, मेसेज केले. या सिक्वेन्स नंतर लोकांना उत्सुकता वाटली की बाबासाहेबांनी नेपोलियनच्या पुस्तकासाठी पायी प्रवास केला म्हणजे त्या पुस्तकात नक्की काही तरी असेल जे आंम्हालाही बघायच आहे. आम्ही ही पुस्तक वाचायला सुरुवात केली. असे वेगवेगळे पैलु सापडले.
- प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया कशा असतात, एखादा प्रसंग?
या भूमिकेने मला स्व:तची वेगळी ओळख दिली. एखाद्या कार्यक्रमाच्या ठिकाणी माझ्या फोटो खाली जेंव्हा फेम डॉ.बाबासाहेब आंबेडकर भिवा अस लिहितात, तेव्हा खुप छान वाटत. इव्हेंटच्या ठिकाणी मला म्हणजेच भिवा म्हणून बघण्यासाठी उसळलेली गर्दी, त्यांच्या भिवाला बघण्यासाठी जमलेले लोक, गर्दी ते बघुन खरच माझ्या डोळ्यात अक्षरशः पाणी येत, की कीती महान कार्य आहे या महामानवाच.
- देशाला संविधानासारखा अमुल्य ठेवा त्यांनी दिला ? त्याबद्दल काय वाटते.
ज्यांनी लहान पणा पासून आयुष्यात केवळ संघर्ष पाहिलाय. त्यांनी त्यांच्या संपुर्ण अनुभवाचा कस लाऊन हे संविधान लिहलय. ते आपल्या प्रत्येकासाठी पुजनीय आहे, प्रत्येकाने या संविधानाचा आदर केला पाहिजे. कारण हे संविधान ज्यांनी लिहिलय त्यांनी शुन्यातून विश्व उभ केले आहे. संविधान हे भारतीय नागरिकांसाठी एक अनमोल देणगी आहे. ज्याने भारतातील सार्वभौमत्व ,समता आणि बंधुता अबाधित राहील.
- बाबासाहेबांनी दिलेली कोणती शिकवण तु जोपासतोस? लोकांनी जोपासावी अस तुम्हाला वाटत.
मला ही भूमिका साकारल्या नंतर इतक नक्की कळलय की आयुष्यात थांबायच नाही. मला माझ ध्येय गाठयच आहे, त्यासाठी मला काहीही झाल, कोणतीही अडचण आली तरी थांबायच नाही इतक नक्की. तीन शब्दात सांगायच झाल तर थांबला तो संपला.
- महापरीनिर्वाण दिनानिमित्त काय सांगशिल?
मी लोकांना इतकच सांगेन की बाबासाहेबां सारख्या महामानवाच्या प्रतिमेला आपण पुजणार आहोत. तेंव्हा या महामानवाला अभिवादन करताना प्रत्येकाने मनात इतकच म्हणा की तुम्ही आयुष्यात जो संघर्ष केलात, तितका संघर्ष करण्याची ताकद आम्हाला द्या, तुम्ही जशी आमच्या आयुष्याला दिशा दाखवलीत, तशी पुढच्या पिढिला दिशा दाखवण्याची जबाबदारी, इच्छा, ताकद आमच्यात येऊ देत इतका आशीर्वाद आम्हाला द्या, असे वचन प्रत्येकाने त्यांच्या प्रतिमेकडे बघुन द्यावे असे मला वाटते.