Ads
स्पोर्टस

अंडर 19 वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा

Priyam-Garg
डेस्क desk team

दक्षिण आफ्रिकेत 17 जानेवारी ते 9 फेब्रुवारी दरम्यान रंगणाऱ्या 19 वर्षाखालील  विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. यामध्ये प्रियम गर्गकडे भारतीय संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आलं असून ध्रुव चंद जुरेल संघाचा उप-कर्णधार असणार आहे.

या संघामध्ये मुंबईच्या अथर्व अंकोलेकर, यशस्वी जैस्वाल यांनाही भारतीय संघात स्थान मिळालं आहे. तसेच 19 जानेवारीला भारत श्रीलंकेविरुद्ध आपला पहिला सामना खेळेल.गतविजेत्या भारतीय संघासमोर यंदाच्या स्पर्धेत न्यूझीलंड, श्रीलंका आणि जपान या संघांचं आव्हान असणार आहे.

भारतीय संघ : यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, दिव्यांश सक्सेना, प्रियम गर्ग (कर्णधार), ध्रुव चंद जोरेल (उप-कर्णधार आणि यष्टीरक्षक), शाश्वत रावत, दिव्यांश जोशी, शुभांग हेगडे, रवी बिश्नोई, आकाश सिंह, कार्तिक त्यागी, अथर्व अंकोलेकर, कुमार कुशाग्र (यष्टीरक्षक), सुशांत मिश्रा आणि विद्याधर पाटील

 

 

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: