बाळासाहेबांचा अधिक सहवास लाभलेले, शिवसेनेतील अनेक बदल अगदी जवळून अनुभवणारे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी आणि शिवसेनेचे एक वेगळे कनेक्शन आहे.प्रचंड गरिबीतूनही त्यांनी केलेला नगरसेवक, महापौर, आमदार, विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्री ते केंद्रात मंत्री आणि लोकसभेचे अध्यक्ष असा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांच्या आयुष्यातील एक आठवण त्यांनी एका कार्यक्रमात सांगितली होती. ती जाणून घेऊयात…
- बाळासाहेबांच्या निधनानंतर प्रथमच दसरा मेळावा होणार होता. या दरम्यान त्यांचा झालेला अपमान संबंध महाराष्ट्राने अनुभवला होता. त्याबाबत खुलासा करताना मनोहर जोशी म्हणाले, मेळाव्यात ज्या पद्धतीने माझा अपमान झाला त्याचे मला खूपच वाईट वाटले.
- त्यावेळी अनेकांना ही गोष्ट खटकली तर काहींनी सहानुभूती दाखवली. परंतु त्या दिवशीचे दसरा मेळाव्यातील उद्धवजींचे ते पहिलेच भाषण होते. हे नीट पार पडावे म्हणून मी तेथून निघून गेलो होतो.
- मात्र त्यावेळी बाळासाहेब असते तर त्यांनी असे काही होऊच दिले नसते. तसे तर मी गैरसमजाचा बळी काही पहिल्यांदा पडलेलो नाही.
- 1999 साली अशाच एका गैरसमजातून माझे मुख्यमंत्रीपद गेले. माझ्या जागी नारायण राणे यांची वर्णी लागली. बाळासाहेबांनी त्यावेळी मला राजीनामा देण्याचे आदेश दिले तेव्हा तात्काळ राजीनामा दिला.
- दरम्यान 1995 साली मुख्यमंत्रीपद मिळावे यासाठी मी आणि सुधीर जोशी दोघेही बाळासाहेबांना भेटलो होतो. साहेबांनी मला पसंती दिली होती.
उद्धव यांचेही माझ्यावर प्रेम आहेच. तथापि वडील आणि मुलाच्या प्रेमाच्या पद्धतीत फरक असू शकतो. त्यामुळेच दसरा मेळाव्यातही गैरसमजाचा फटका बसल्यानंतरही मी सारे काही माफ करू शकलो.