Ads
राजकीय घडामोडी

महाविकास आघाडीकडून बहुमत सिद्ध !

udhav
डेस्क desk team

विधानसभेत महाविकास आघाडीला 169 आमदारांनी पाठींबा दर्शवला आहे. त्यामुळे बहुमत चाचणी महाविकास आघाडी यशस्वी ठरली असून आता राज्यात महाविकास आघाडीच सत्तेच्या खुर्चीवर बसण्यावर शिक्कामोर्तब झाल आहे.

महाविकास आघाडीच सरकार स्थापन झाल्यानंतर आज विश्वासदर्शक ठरावाची चाचणी दुपारी 2 वाजता सुरुवात झाली. यावेळी काँग्रेसचे आमदार अशोक चव्हाण यांनी विश्वासदर्शक ठराव मांडला, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक, जयंत पाटील आणि शिवसेनेचे आमदार सुनिल प्रभू यांनी अनुमोदन दिलं

विधानभवनातून लाईव्ह

महाविकास आघाडीच्या सरकारला 169 आमदारांनी सभागृहात समर्थन दर्शवल्याने उद्धव ठाकरे सरकारने हा विश्वासदर्शक ठराव जिंकला. हंगामी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी ही ही घोषणा केली. यावेळी 4 आमदारांनी तटस्थ भुमिका घेतली. तर भाजपाच्या सर्व आमदारांनी सभागृहाचा त्याग केल्याने शून्य आमदारांनी याला विरोध केला असे वळसे-पाटील यांनी जाहीर केली.

ठाकरे सरकार विश्वासदर्शक ठराव: भाजपचा सभात्याग, देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: