2008 साली 26 नोव्हेंबरला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला यंदा 11 वर्षे पुर्ण झाली. मात्र आजही या घटनेच्या अनेक जखमा ताज्या आहेत. अशातच याच कटूआठवणींना हॉटेल मुंबई या चित्रपटातुन मोठ्या पडद्यावर साकारण्यात दिग्दर्शक अँथनी मारस बऱ्यापैकी यशस्वी झाला आहे. खर तर हा त्याचा दिग्दर्शनाचा पहिलाचा प्रयत्न असून, 26/11 सारखा गंभीर विषय आणि प्रसंग मोठ्या पडद्यावर अतिशय उत्तमरित्या साकारण्यात त्याला यश आले आहे. हॉटेल ताजमध्ये झालेल्या हल्ल्याला केंद्रस्थानी ठेवुन चित्रपट बनवण्यात आला आहे. अभिनेते अनुपम खेर या चित्रपटात मध्यवर्ती भुमिकेत असून देव पटेल याची त्यांना चांगसी साथ लाभली असून ,आर्मी हेमर, नाझनीन बोनिडी, विपिन शर्मा यांच्या देखील चित्रपटात भूमिका आहेत.
अचुक मांडणी
तस पाहायला गेल तर 26/ 11 चा दहशतवादी हल्ला सगळ्यांना माहिती आहे. मुंबईच्या सीएसटी स्थानकावर दहशतवाद्यांनी गोळीबार केलेला असताना, इकडे ताज हॉटेलमध्ये इथे काही झाले असल्यापासून सगळेच अनभिज्ञ आहेत. ताज मधील मुख्य शेफ हेमंत ऑबेरॉय (अनुपम खेर), डेव्हिड डंकन (आर्मी हेमर) आणि जारा (नाझनीन बोनिडी), रशियन व्यापारी (जेसन आईसेक) सारखे अनेक व्हीआयपी अतिथी हॉटेलमध्ये राहण्यासाठी आलेले असल्याने कर्मचाऱ्यांना त्यांच्या पाहुणचारासाठी इन्सट्रक्शन देत आहेत. वेटर अर्जुन देव (देव पटेल) याने शुज न घातल्याने हेमंत ऑबेरॉय त्याला घरी जायला सांगतात, मात्र आपल्याला नोकरीची गरज आहे असे तो सांगतो, या प्रसंगाने कथानकाची सुरवात होते. त्यानंतर दहशतवाद्यांचा ताजमध्ये शिरकाव होतो आणि मग सुरु होतो थरार.
जिवंत प्रसंगांचा भास
या चित्रपटात हेमंत ऑबेरॉय आणि वेटर अर्जुन देव हॉटेलमधील विदेशी पाहुण्यांसह प्रत्येक हॉटेल रहिवाशांना वाचवण्यासाठी करत असलेली कसरत. गोळ्यांचा आवाज रक्ताच्या थारोळ्यात पडलेले लोक, दहशत, भिती या सगळ्यात घडणारे एक-एक भावनिक प्रसंग प्रेक्षकांची चित्रपटाशी असलेली नाळ बांधुन ठेवतात. 26-11 चा थरार मोठ्या पडद्यावर अनुभवण्यासाठा एकदा चित्रपट गृहात जरुर जा.