आजकालच्या मराठी चित्रपटातील कथेला चांगलेच स्वातंत्र मिळत असल्याचे पाहायला मिळते. वेगवेगळे विषय हाताळताना दिग्दर्शक आणि लेखक दिसतात. ‘गर्ल्स’ या चित्रपटाची कथा ही अशीच चौकटी बाहेरील आहे. प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाच्या पोस्टर, टीझर आणि ट्रेलरमुळे सर्वत्र या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर ‘गर्ल्स’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. अंकिता लांडे, केतकी नारायण, अन्विता फलटणकर, पार्थ भालेराव, देविका दफ्तरदार आणि अतुल काळे हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसले आहेत. विशिष्ट चौकटीत आयुष्य जगणे नाकारणाऱ्या मित्र-मैत्रिणींच्या गोष्टी आपण आतापर्यंत अनेक चित्रपटांतून पाहिल्या आहेत. यालाच साजेसा ‘आता नुसता राडा’ अशी टॅगलाइन घेऊन तीन मैत्रिणींची गोष्ट ‘गर्ल्स’ या चित्रपटातून प्रेक्षकांना दाखवण्यात आली आहे.
चित्रपटाची कथा
चित्रपटाची कथा मती (अंकीता लांडे) हीच्या भोवती फिरणारी आहे. आईच्या (देविका दाफ्तरदार) सततच्या बंधनांना आणि नियमांना मती पूर्ती कंटाळलीले आहे. त्यामुळे वडिलांच्या मदतीने ती कोल्हापूरमध्ये राहिला येते. तिथे तिची ओळख होते सखाराम ढोले पाटीला बरोबर. सखाराम तिला आपले आयुष्य नव्याने जगण्यासाठी गोव्याला पाठवतोय. गोव्यात तिला मॅगी (केतकी नारायण) आणि रूमी (अन्विता फलटणकर) या दोघी भेटतात. ख्रिश्चन कुटुंबातील मॅगा ही बिनधास्त आयुष्य जगणारी आणि सर्व मर्यादा खुलेआम ओलांडणारी आहे, तर रूमीची कैंटुंबिक परिस्थितीही काही वेगळी नव्हती. मॅगी आणि रूमीची मती सोबत चांगली गट्टी जमते. गोव्यात मती करत असलेले प्रताप तिचे आई-वडिल सोशल मीडियावर पाहात असतात. त्यामुळे ट्रीप अर्धवट सोडून मतीला घरी परतावे लागते. त्यानंतर मतीचा ‘स्व’शोधाचा प्रवास सुरू होतो. त्यामुळे आता मतीला अपेक्षित आयुष्य जगण्यास मिळते का? मॅगी आणि रूमीच आणि त्यांच्या कुटुंबाच काय होत? पून्हा या तिन्ही मैत्रिणी एकत्र येतात का? स्वतंत्र आयुष्यासाठी मती कैटुंबिक बंधणे मोडीस काढते का? तसेच तिचे आई-वडिल नेमकी काय भूमिका घेतात? यासारख्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला पडली असेलच त्यासाठी गर्ल्स हा चित्रपट तुम्हाला पाहावा लागेल.
कलाकारांचे काम
बंडखोर मुलींची गोष्ट दाखवणाऱ्या ‘गर्ल्स’ चित्रपटतून स्त्रीमुक्तीचा नारा लेखक-दिग्दर्शक देताना दिसत आहेत. या चित्रपटाची भाषा बोल्ड आणि संवाद एकदम डॅशिंग आहेत. चित्रपटात अंकिता, केतकी आणि अन्विता या तिघींनी आपापल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. तसेच इतर कलाकारांनीही आपली भूमिका योग्य रित्या निभावली आहे. हा चित्रपट आजच्या काळाता सिनेमा आजच्या पिढीने पाहावा असा आहे. मात्र, त्यांनाही कितपत रुचतो हा प्रश्न मात्र समोर येतो. पण टाइमपासच्या उद्देशाने हा चित्रपटत पाहाण्यासाठीच नक्की जा. सदर चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल देवरुखकर आणि लेखन हृषीकेश कोळी यांनी केल आहे.