Ads
राजकीय घडामोडी

‘मी उद्धव बाळासाहेब ठाकरे’… आज शिवतीर्थावर होणार शपथविधी

डेस्क desk team

महाविकासआघाडीने 26 नोव्हेंबर रोजी राज्यातील सत्तास्थापनेच्या संघर्षावर पडदा टाकत अखेर या राजकीय खेळीचा शेवट केला. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या महाविकासआघाडीने सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thakre) नावावर मुख्यमंत्रिपदासाठी शिक्कामोर्तब झाल्यानंतर आता ते 1 डिसेंबर रोजी शपथविधी घेण्याचे ठरले होते. मात्र आता या कार्यक्रमात थोडा बदल करण्यात आला असून 28 नोव्हेंबरला म्हणजेच उद्या शिवतीर्थावर संध्याकाळी 6.40 मिनिटांनी शपथविधीचा सोहळा पार पडणार आहे.

26 नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर घाईघाईत बनलेल्या सरकारचे संपूर्ण चित्रच बदलून गेले. सर्वात कमी तासांसाठी बनलेले मुख्यमंत्री असे देवेंद्र फडणवीस यांना सर्व हिणवू लागले. त्यानंतर काही वेळातच उपमुख्यमंत्री झालेले अजित पवार आणि त्यांच्या पाठोपाठ मुख्यमंत्री झालेले देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला.

 

मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे. या बैठकीनंतर महाविकासआघाडीचे नेते आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे, जयंत पाटील, छगन भुजबळ, जयंत पाटील आणि घटकपक्षांचे नेते राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आणि सत्ता स्थापनेचा दावा केला. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये 1 डिसेंबर रोजी शपथविधी घेण्याचं आमचं ठरलं होतं. पण त्याऐवजी 28 नोव्हेंबर रोजी 6.40 वाजता शिवतीर्थावर शपथ घेणार आहे, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.

मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये महाविकासआघाडीच्या बैठकीत अनेक शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला. उद्धव ठाकरे यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी घोषित करत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन केले. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालानुसार आज महाविकास आघाडी सत्ता स्थापन करणार आहे. या पार्श्वभुमीवर राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी विधानसभेचे विशेष अधिवेशन आयोजित केले आहे. यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री आणि अन्य सर्व आमदारांच्या शपथविधीला सुरुवात झाली आहे.

 

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: