Ads
बातम्या

गळफास घेऊन विवाहितेची आत्महत्या!

Nashik Sonai Massacre
नाशिक सोनाई हत्याकांड,
डेस्क desk team

विरार पूर्वेत एका विवाहीतेने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अंजली नवीन शुक्ला असे या २४ वर्षीय महिलेचे नाव आहे. या प्रकरणी विरार पोलिस ठाण्यात महिलेच्या आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चंदनसार परिसरातील मेक्विन हाईटस बिल्डिंगमध्ये एका विवाहितेने राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सोमवार 25 नोव्हेंबरला रात्री 9 ते 9.30 च्या सुमारास हि घटना घडली. या महिलेने दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. अंजली नवीन शुक्ला असे मयत २४ वर्षीय महिलेचे नाव आहे. दरम्यान अंजलीचा पती नविन शुक्ला हा नेहमी प्रमाणे आपल्या घरी आला असताना त्याला हा प्रकार कळला.

घरी आल्यावर त्याला आपल्या पत्नीने घरातील हॉलमध्ये असलेल्या लोखंडी सळईला ओढणीने बांधुन आपल्या पत्नीने आत्महत्या केली असल्याचे दिसल्याची माहिती पोलिसांना दिली. या घटनेची माहिती त्याने रात्री उशीरा 12.30 च्या सुमारास पोलिसांना दिली. तसेच या घटनेत  आपली कोणा विषयी तक्रार नसुन कोणावरही संशय नसल्याचे तक्रार देताना त्याने सांगितले. यावेळी विरार पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक एस. ए. राणे यांनी घटनास्थळी जाऊन तपासणी करत पंचनामा केला. दरम्यान, या महिलेच्या आकस्मित मृत्यूची नोंद विरार पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, अधिक तपास विरार पोलिस करत आहेत.

 

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: