मराठी महिन्यातील नववा महिना हा मार्गशिर्ष महिना. हिंदू संस्कृतीत श्रावण मासाप्रमाणेच मार्गशिर्ष महिन्याला अनन्य साधारण महत्व आहे. मार्गशिर्ष महिन्यात महालक्ष्मीचे व्रत केले जातात. गुरूवारच्या दिवशी उपवास ही केला जातो. दिवसभर उपवास करून रात्री सागर संगीत नैवैद्य दाखवून उपवास सोडला जातो. मात्र, दिवस भर उपवास असल्याने उपवासाच्या दिवशी फळे किंवा उपवासाला खाल्ले जाणारे पदार्थ खाल्ले जातात. मात्र, एकच साबुदाना खिचडी, पेज, बटाटा भाजीचा फराळ करून तुम्हाला कंटाळा आला असेल तर आम्ही आज तुम्हाला काही नवीन आणि नेहमी पेक्षा वेगळे उपवासाचे पदार्थ घेऊन आलो आहोत. जाणून घेऊयात खास उपवासाच्या पदार्थांची रेसिपी…
उपवासाची चपाती-भाजी
दररोज सगळेच चपाती भाजी खातच असतात. मात्र, उपवासाची चपाती आणि भाजी कधीच खाली नसेत. तर पाहा रेसिपी उपवासाची खुसखुशीत पौष्टीत चपाती-भाजी.
साबुदाणा थालीपीठ
उपवासाला साबुदाण्याची खिचडी प्रत्येक घरा-घरात केली जाते. मात्र, त्याच साबुदाणाचा थालीपीठ कधी खाल्ला आहात का? तर आता जाणून घ्या साबुदाण्याचा थालीपीठ रेसिपी.
उपवास ढोकळा
इतर दिवशी चटपटीत पदार्थ खाण्याकडे सगळ्यांचा कल असतो. त्यात चटपटीत पदार्थामध्ये खमंग ढोकळा आवडीने खाल्ला जातो. मात्र, आता उपवासा दिवशी तुम्ही ढेकळा खाऊ शकता. तर जाणून घ्या उपवासाच्या ढोकळ्याची रेसिपी.
फराळी मिसळ
साबुदाणा बटाटा, बटाट्याचा तळलेला किस, रताळ्याचे छोटे तुकडे, अर्धी वाटी खोवलेला नारळ, शेंगदाणे, हिरव्या मिरच्या, जिरं, मीठ, दही, कोथिंबीर, तूप हे साहित्य घेऊन तुम्ही एक स्वादिष्ट आणि पौष्टीक फराळी मिरळ तयार करू शकता. तर पाहा त्याची रेसिपी.
उपवासाचे धिरडे
उपवासाच्या दिवशी कुरकुरीत उपवासाचे धिरडे बनवणं अगदी सोपं आहे. यासाठी तुम्हाला उपवासाचं भाजणीचं पिठ लागेल. तव्यावर मंद आचेवर तुम्ही कुरकुरीत उपवासाचे धिरडे बनवू शकता.