‘सई ताम्हण’करची मुख्य भूमिका असलेला आणि ‘गजेंद्र आहिरे’ दिग्दर्शित ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ हा मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झालाय. मराठीतील बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळख असलेल्या सईची आणखी एक वेगळी भूमिका या चित्रपटात प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. राजेश श्रृंगार पुरे, निखिल रत्नपारखी निना कुलकर्णी यांच्या देखील या चित्रपटात भूमिका आहेत. नेहमी प्रमाणेच गजेंद्र आहिरे यांनी केवळ नायक किंवा नायिका नाही तर कथेतील प्रत्येक पात्रा भोवती फिरणारी कथा आणि प्रत्येक पात्राच्या नजरेतून सांगणारे असे या चित्रपटाचे कथानक आहे.
काय आहे कथानक
या चित्रपटाच्या पोस्टरवरच तिला आयुष्य बदलायच होत, तिने कपडे बदले, घर बदले, नवरा बदला, मात्र तिने आयुष्य बदलला का ? असा प्रश्न विचारलाय. त्यात दोन आडनाव असलेल चित्रपटाच नाव प्रेक्षकांना विचार करायला लावत. सई ताम्हणकरने या चित्रपटात जया ऩावाची भूमिका साकारली आहे, तर अविनाश देशपांडे (निखिल रत्नपारखी ) तिच्या नवऱ्याच्या भूमिकेत आहे. अविनाश आणि जयाचा डिवॉर्स झालेला असतो. अमेय देशपांडे ( पियुष ) सईच्या मुलाच्या भूमिकेत आहे. डिवॉर्स मुळे जया आई निना कुलकर्णी सोबत राहत असते. अशातच तिच्या आयुष्यात सतीश कुलकर्णी (राजेश श्रृंगारपुरे) येतो आणि मात्र दोघांनाही मुल असल्याने त्यांच्या लग्नासाठीच्या अडचणींमधुन कुलकर्णी आणि देशपांडे असा पेच निर्माण होतो. या लहान मुलांच्या आय़ुष्यात काय परिणाम होतो पुढे काय हे जाणुन घेण्यासाठी चित्रपट पाहावा लागेल.
सुंदर विषय
चित्रपटाचा विषय हा काहीसा वेगळा असून, प्रत्येक पात्राने त्यांच्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. खुप मोठा विषय अडीच तासात पेलण्याचे आवाहन दिग्दर्शक गजेंद्र आहिरे यांनी चांगले केले आहे. निना कुलकर्णी आणि सई यांच्यातील आई मुलीचे प्रसंग तसेच संवाद खुप भावनिक आणि सुंदर आहेत. एक प्रेयसी, पत्नी, आई, मुलगी अशा चौफेर भूमिका सईने सुंदर रित्या निभावल्या आहेत. प्रभावी कथानक आणि क्षणा क्षणाला बदलत जाणार समीकरण, पेच प्रसंग प्रेक्षकांना खिळवुन ठेवतात.