Ads
बातम्या

राज ठाकरेबाबत आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या तरुणाला ‘मनसे’ चोप

नाशिक   –  नाशकात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचाबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या तरुणाला मनसे कार्यकर्त्यांनी चोप दिलाय. या संबधित घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होतोय.

पुलवामा हल्ल्यातील घटनेवर राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली होती. या प्रतिक्रियेला अनुसरून तरुणाने आक्षेपार्ह कमेंट केले होते.

या तरुणाचा मनसे कार्यकर्त्यांनी शोध घेत त्याला बेदम चोप दिला. दरम्यान तरुणाच्या वडिलांनी मध्यस्थी केल्याने त्याला सोडून देण्यात आले.

About the author

बातमीदार

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: