अनीस आजमी दिग्दर्शीत आणि भुषण कुमार निर्मित पागलपंती हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झालाय. अनिल कपुर, अर्शद वारसी, जॉन अब्राहम यांसारखी मोठी स्टार कास्ट असून देखील हा चित्रपट बघताना कॉमेडीची पागलपंती पुर्ण पणे फसल्याचे चित्रपट पाहाताना जाणवते. काही कॉमेडी प्रसंग आणि चित्रपटातला सिनॅरिओ सोडला तर केवळ अडीच तास टाईमपास करायचा असेल, टाईमपास म्हणजे थोडा टाईमपास आणि बाकी वेळ वाया घालवायचा असेल तर सिनेमा बघायला हरकत नाही.
काय आहे कथानक
राज किशोर म्हणजे जॉन अब्राहम, अर्शद वारसीने साकारलेला जंकी आणि चंदु ची भूमिका साकारलेला पुलकीट सम्राट या तिन मित्रां भोवती या सिनेमाचे कथानक फिरते. या चित्रपटाचे कथानक ब्रिटनमध्ये घडत असून, या तिघांमुळे अनेक चित्र विचित्र घटना घडत असतात. अशातच एका अपघातात ते गॅंगस्टर असलेल्या राजाभाई आणि वायफाय भाई म्हणजेच सौरभ शुक्ला आणि अनिल कपुर यांच्या संपर्कात येतात. शहरातील मोठे हस्ते म्हणून ते लोकांच्या ओळखीचे असतात. तर टुल्ली आणि बुल्ली हे त्यांचे अंडर्वल्ड मधले विरोधक असतात. या तिन मित्रांच्या सहाय्याने त्या दोन दुश्मनां सोबत हे सगळे मिळुन जो धुमाकुळ घालतात ते म्हणजे या सिनेमाचे टायटल पागल पंती.
मिस्क झालेला मसाला
नीरज मोदी नामक बॅंक फ्रॉड करुन भारतातून पळुन ब्रिटनमध्ये आलेल एक पात्र देखील घेऊन जबरदस्तीची कॉमेडी आणि ड्रामा करण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केलेला आहे. उगाचच ओढातान केली असे चित्रपट पाहताना वाटते. अनिल कपुर, अर्शद वारसी यांचे काही कॉमेडी सिन सोडले तर चित्रपट कंटाळवाना आणि वेस्ट ऑफ टाईमच आहे.