केंद्र सरकारने एलपीजी गॅस सबसिडीचे अनुदान देण्याची घोषणा केली होती. त्याअंतर्गत नागरिकांना अनुदान त्याच्या थेट बँक खात्यात देण्यात येतेय. मात्र काही नागरिकांना हे अनुदान न मिळत असल्याचा घोळ आहे.
जर तुमच्या बाबतीत असा घोळ असेल तर www.mylpg.in या साईटला भेट द्या. साईटवर उजव्या बाजूला गॅस कंपन्यांची नावे विचारले जाईल. तो टाकून एलपीजी आयडी आणि रजिस्टर्ड मोबाईल नंबर टाकल्यास सब्सिडीचे डिटेल मिळणार.
जर सब्सिडीचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये जमा होत नसतील तर तुम्ही साईटवर असलेल्या फिडबॅकच्या बटनवर क्लिक करुन तक्रार नोंदवता येणार. यासह 18002333555 वर फ्रि-कॉल करुन तक्रार नोंदवू शकता.