Ads
बातम्या

रेतीमाफियांवर महसूल विभागाची धडक कारवाई

reti bandar
डेस्क desk team

विरारच्या रेतीबंदरावर गेल्या काही महिन्यापासून रेतीमाफियांकडून तेजीत रेती उपसा सुरु होता. या अवैधपने सुरु असलेल्या खार्डी आणि खाणीवडे येथील रेती उपसावर महसूल विभागाने धडक कारवाई केली आहे. या कारवाईत 60 रेती कुंड्या, 70 झोपड्या तोडून भुईसपाट करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर 300 ब्रास रेतीसाठा पुन्हा पाण्यात टाकण्यात आला आहे. या घटनेत पुढील चौकशी सुरु असून दोषींवर कारवाई करण्यात येणार आहे.

विरारमध्ये खार्डी, खाणीवडे, वैतरणा उसगाव, नारंगी अशी रेती बंदर आहेत. या रेतीबंदरावर रेतीमाफियांचा नेहमीच डोळा असायचा. त्यातच खार्डी आणि खाणीवडे रेतीबंदरावर बिनधास्तपणे रेतीउपसा सुरु होता. या घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाने या रेतीमाफियांवर धडक कारवाई केली. या कारवाईत 60 रेती कुंड्या, 70 झोपड्या तोडून भुईसपाट करण्यात आल्या. पाण्याच्या पंपिंग मशीन सुद्धा जळवून नष्ट करण्यात आली. तसेच जप्त करण्यात आलेला 300 ब्रास रेतीसाठा परत पाण्यात टाकण्यात आला.

 

वसईचे उपविभागीय अधिकारी प्रशांत तांगडे, तहसीलदार किरण सुरवसे यांच्या नेतृत्वाखाली हि कारवाई करण्यात आली. या कारवाईत 12 जेसीबी, तलाठी, मंडलाधिकारी व विरार पोलिसांचा सहभाग होता. या कारवाईने आता रेतीमाफियांचे धाबे दणाणले आहेत.

दरम्यान या घटनेत एकाही आरोपीला अद्याप ताब्यात घेण्यात आले नाही आहे. मात्र पुढील चौकशी करून लवकरच दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे उपविभागीय अधिकारी प्रशांत तांगडे यांनी सांगितले आहे. तसेच या रेती बंदरावर पुन्हा रेती माफियांकडून रेती उपसा होऊ नये म्हणून महसूल आणि पोलीस मिळून भरारी पथक तयार केलेले आहे. हे पथक या रेती बंदरांवर लक्ष ठेवून असणार आहे. ग्रामदक्षता ज्या समित्या आहेत त्यांना देखील आम्ही सतर्क राहण्यास तांगडे यांनी सांगितले.

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: