रियलमी ही चीनी स्मार्टफोन कंपनी आज आपला नवा स्मार्टफोन भारतात लाँच करणार आहे. ‘Realme X2 Pro’ असे या स्मार्टफोनचे नाव आहे. नवी दिल्लीत होणाऱ्या एका कार्यक्रमात हा स्मार्टफोन लाँच केला जाणार आहे. तसेच याच कार्यक्रमात रियलमीचा मिडरेंज स्मार्टफोन ‘रियलमी 5 एस’ देखील लाँच केला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Realme X2 Proची वैशिष्ट्ये
- 6.5 इंचाचा फुल एचडी+सुपर AMOLED फ्लूईड, 90Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले
- क्वालकॉमचा अद्ययावत स्नॅपड्रॅगन 855+ प्रोसेसर
- 64+13+8+2 मेगापिक्सलचा क्वाड रियर कॅमेरा सेटअप
- सेल्फिसाठी 16 मेगापिक्सल कॅमेरा
- 50 डब्ल्यू सुपरवूक फास्ट चार्ज सपोर्ट
संभाव्य किंमत
डिव्हाइसचे चायनीज व्हेरियंट 128 जीबी स्टोरेज आणि 12 जीबी रॅमसह लॉन्च केले गेले आहे. रिअलमी एक्स 2 प्रो चे उत्पादन पेज लाइव्ह झाले आहे. हे डिव्हाइस फ्लिपकार्ट एक्सक्लुझिव्ह असू शकतं. याशिवाय हे डिव्हाइस रिअलमी ऑनलाइन स्टोअरवरही उपलब्ध असेल. या डिव्हाइसचे बेस व्हेरिएंट जवळपास 30 हजार रुपयांच्या प्राइस टॅगवर लाँच केले जाऊ शकते.