शिवकालीन इतिहासातील पराक्रमी माळवा म्हणून ओळख असणाऱ्या तान्हाजी मालूसरे यांच्या गाजलेल्या पराक्रमांवर ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ या चित्रपटातून रूपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रसिकांच्या भेटीस आला आहे. या बहुप्रतिक्षित चित्रपटात तानाजी मालूसरे यांच्या भूमिकेत अजय देवगण तर उदयभानच्या भूमिकेत सैफ अली खान झळकणार आहेत. खूप वर्षानंतर पुन्हा एकदा रसिकांना अजय आणि सैफला एकत्र काम करताना पाहायला मिळणार आहे.
ट्रेलरमध्ये काय?
‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये 17 व्या शतकात शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यामध्ये कोंढणा किल्ला पुन्हा जिंकण्यासाठी तानाजी मालुसरे यांना वीरमरण आले. त्यांचा हा पराक्रम सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच रसिकांसमोर येणार आहे. हा सिनेमा 3 डी माध्यमातूनही रीलीज करण्यात येणार आहे. त्यामुळे युद्ध प्रसंगांदरम्यानची थरारक खास अनुभवायला मिळणार आहे.
या दिवशी होणार प्रदर्शित
या चित्रपटात अजय देवगण आणि काजोल सुद्धा खूप वर्षांनंतर एकत्र काम करणार आहेत. ओम राऊत यांनी तान्हीजी या चित्रपटाची धुरा हाती घेतली आहे. हा चित्रपट चित्रपटगृहात 10 जानेवारी 2020 मध्ये सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.