Ads
टेक- टॉक

‘Redmi Note 8’ चा आकर्षक सेल; जाणून घ्या बेस्ट ऑफर्स, किंमत  

xiaomi redmi note 8
डेस्क desk team

लोकप्रिय चीनी कंपनी शाओमीचा ‘Redmi Note 8’ खरेदी करण्याची आज नामी संधी ग्राहकांना मिळाणार आहे. दुपारी 12 वाजल्यापासून नवीन बजेटमध्ये स्मार्टफोनचा सेल सुरू होणार आहे. हा स्मार्टफोन ग्राहकांना ‘Amazon इंडिया’ आणि ‘mi.com’ या ई-कॉमर्स संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. तसेच आज सेलमध्ये कंपनी ‘Redmi Note 8’ च्या खरेदीवर आकर्षक ऑफर्स देणार आहे.

फीचर्स

 • 6 जीबी रॅमसह स्नॅपड्रॅगन 665 प्रोसेसर
 • Android 9 वर आधारित MIUI 10 ऑपरेटिंग सिस्टम
 • 6.39 इंचांचा फुल एचडी डिस्प्ले
 • 48+2+2 मेगापिक्सलचा क्वाड रियर कॅमेरा सेटअप
 • सेल्फीसाठी 13 मेगापिक्सल कॅमेरा
 • 4000mAh ची बॅटरी, 18 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट

ऑफर्स

 • तुम्ही एअरटेलचा प्रीपेड नंबर वापरत असाल तर तुम्हाला हा फोन खरेदी केल्यावर डबल डेटा बेनिफिट मिळेल. डबल डेटा बेनिफिट 249 आणि 349 रुपये रिचार्जवर मिळेल.
 • एचडीएफसी बँकेच्या डेबिट कार्डद्वारे शॉपिंगवर 10 टक्के किंवा 500 रुपयांपर्यंतचे कॅशबॅक उपलब्ध असेल. त्याचबरोबर एचएसबीसी कॅशबॅक कार्डवर 5 टक्के इन्स्टंट डिस्काउंट ऑफरदेखील आहे.
 • आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डसह ईएमआयवर हा फोन खरेदी केल्यास तुम्हाला 1500 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.
 • 4 जीबी रॅम+64 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 9,999 रुपये आणि 6 जीबी रॅम+128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 12,999 रुपये आहे.
 • हा स्मार्टफोन सेलमध्ये मूनलाइट व्हाईट, नेपच्यून ब्लू आणि स्पेस ब्लॅक कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध असणार आहे.

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: