मुंबई – मध्य रेल्वेच्या प्रवाशांना उद्यापासून विविध नवीन सेवा मिळणार. काही स्थानकात नविन लोकल सेवा तर पादचारी पुल व सरकता जिन्याचे उद्घाटन रेल्वेमंत्री पियूष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित होणार.
परळ टर्मिनससह कुर्ला, लोकमान्य टिळक टर्मिनस, सायन, दिवा येथील पादचारी पुलांचे उद्घाटन, सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद नवीन मार्गिका, अंबरनाथ स्टेशनची सुधारणेचे आणि सरकता जिन्याचे उद्घाटन यासह पुणे-नागपूर हमसफर एक्स्प्रेसचे उद्घाटन करण्यात येणार.
परळवरून पहिली लोकल धावणार
परळ टर्मिनसहून कल्याण दिशेकडे पहिली लोकल सकाळी ८ वाजून ३८ मिनिटांची लोकल चालविण्यात येणार. कल्याण दिशेकडे १६ फेऱ्या आणि परळ दिशेकडे १६ फेऱ्या अशा एकूण ३२ फेऱ्या चालविण्यात येणार.
सीएसएमटी-डोंबिवली १५ डब्बा धावणार
सोमवारपासून सीएसएमटी-डोंबिवली १५ डब्यांची लोकल धावणार. दररोज हि ट्रेन डोंबिवली वरून सीएसएमटीला सकाळी ६.१४ व सीएसएमटी वरून डोंबिवलीला सकाळी ११.३७ धावणार. ठाणे, भांडुप, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा असे तिचे थांबे असणार, सोमवार ते शुक्रवार अशा २२ फेऱ्या असणार असून शनिवार १६ फेऱ्या मारणार. रविवारी ही लोकल धावणार नाही.