Ads
बातम्या

मुंबई महापौर निवडणुकीतून भाजपची माघार

MAHAPALIKA
डेस्क desk team

राज्यात सत्ता स्थापनेवरून भाजप-शिवसेनेत वाद सुरु असताना, या वादाचे पडसाद मुंबई महापौर निवडणुकीत पडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र हि चर्चा आता फोल ठरली आहे. कारण मुंबई महापौर निवडणुकीत भाजपने माघार घेतली आहे.

भाजपचे मुंबईतील खासदार मनोज कोटक यांनी आज याबाबत पक्षाच्या भूमिकेची माहिती दिली. ‘महापौर निवडून आणण्याइतकं संख्याबळ सध्या भाजपकडे नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं आकड्याचा खेळ करण्यात आम्हाला रस नाही. आमचे नगरसेवक मुंबईकरांना सेवासुविधा देण्याचं काम करतच राहतील आणि या कामाच्या व भविष्यातील संख्येच्या बळावर २०२२ साली मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर नक्की बसवू, असा विश्वास कोटक यांनी व्यक्त केला.

आज महापौर पदासाठी निवडणूक अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे. दरम्यान काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची दाट शक्यता आहे. महाशिवआघाडीच्या चर्चा सुरु असल्या तरी मुंबई महापालिकेत काँग्रेस विरोधी पक्षाच्या भूमीकेतच राहणार आहे, अशी माहिती मुंबईतील काँग्रेस नेत्यांनी दिली.

‘या’ उमेदवारांची नावे

मुंबई महापालिकेत महापौर पदासाठी शिवसेनेकडून यशवंत जाधव यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. माजी शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर, माजी बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर,महिला विभाग प्रमुख किशोरी पेडणेकर, शेखर वायंगणकर सभागृह नेत्या आणि माजी आमदार विशाखा राऊत यांची नावे महापौर पदाच्या शर्यतीत आहे.

निवडणूक

मुंबई शहराचे महापौर पद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. खुल्या प्रवर्गातून कोणताही महिला किंवा पुरुष नगरसेवक महापौर होऊ शकत असल्याने महापौर पदासाठी इच्छुक नगरसेवकांची संख्या वाढणार आहे. या पदासाठी येत्या 22 नोव्हेंबरला निवडणूक होत आहे तर 18 नोव्हेंबर ही महापौरपदाची उमेदवारी भरण्यासाठीची अंतिम तारीख आहे.

पक्षीय बलाबल

  • शिवसेना ९४
  • भाजप ८२
  • काँग्रेस २९
  • राष्ट्रवादी ८
  • समाजवादी पक्ष ६
  • मनसे १

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: