नालासोपारा पूर्वेच्या तुळींज पोलीस स्टेशन हद्दीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घड्ली आहे. या घटनेत नराधम आरोपींने मुलीवर तब्बल 12 तास सामुहिक बलात्कार केला. पोलिसांनी या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली असून मुख्य आरोपी फरार आहे. पॉस्को अंतगर्त या चौघा नराधमांविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिकचा तपास सुरू केला आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ माजली आहे. तसेच महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
शहरात एका अल्पवयीन मुलीवर चौघा नराधमांनी मिळून तब्बल 12 तास सामुहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेतील तीन आरोपींना अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी फरार आहे. या संदर्भात तुळींज पोलिसानी पॉस्को अंतगर्त चौघा नराधमांविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिकचा तपास सुरू आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ माजली असून महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
पूर्वेतील गाला नगर येथील रहिवाशी असलेली पिडीत मुलगी शनिवारी पहाटे 5.30 वाजता आपल्या दोन मित्रांच्या येथे नागेला तलावावर मॉर्निंग वॉकसाठी गेली होती. यावेळी आरोपी अमित बटला तिच्याजवळ आला आणि तिला म्हणाला, तू माझ्याबरोबर येतेस कि नाय, कि मी तुला उचलून घेऊन जाऊ. यावेळी मुलीने यास नकार दिला. यावेळी आरोपीने अमितने पिडीत मुलीला चाकुची भीती दाखवत जबरदस्ती रिक्षात बसवले. यावेळी पिडीत मुलीसोबत असलेल्या मित्रानी याचा विरोध केला. मात्र त्यांनाही आरोपिंनी धमकावत फरार झाले.
चारही आरोपींनी पिडीत मुलीला वैती वाड़ी परीसरातील मोहम्मदी बिल्डिंगच्या चौथ्या मजल्यावर नेऊन डांबून ठेवले यावेळी चौघाही नराधमांनी 12 तास तिच्यावर आळी-पाळीने सामुहिक बलात्कार केला. यांनतर संध्याकाळी 5 वाजताच्या दरम्यान तीने आरोपींच्या तावडीतून सुटून पळ काढला आणि थेट तुळींज पोलीस स्टेशन गाठत घडलेल्या घटनेची माहिती दिली.
यावेळी तुळींज पोलिसांनी पिडीत मुलीने दिलेल्या तक्रारीवरून अमित बाटला, रोहित उर्फ मेंटल, कैलाश आणि आणखी एका अल्पवयीन आरोपीवर पॉस्को अंतगर्त गुन्हा दाखल केला आहे. असून अधिकचा तपास सुरू आहे. दरम्यान शहरात या घटनेने एकच खळबळ माजवली. पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. त्याचबरोबर महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
पिडीत मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार घटनास्थळावरून आम्ही रोहित, कैलाश आणि एका अल्पवयीन आरोपीला शनिवारी रात्री अटक केली आहे. तर मुख्य आरोपी अमित बाटला घटनास्थळावरून फरार झाला होता. या फरार आरोपीच्या आम्ही मागावर असून लवकरच त्याला अटक करू. या प्रकरणी अधिकचा तपास सुरु आहे.
-मल्हार थोरात, पोलीस उपनिरीक्षक, तुळींज पोलीस.