सर्वोच्च न्यायालयाच्या अयोद्धा प्रकरणाच्या सुनावणीमुळे रद्द झालेल्या सीए परिक्षेचे नवे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे जे विद्यार्थी सीए फायनल, सीए इंटर किंवा फाऊंडेशनच्या परीक्षेसाठी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हे नवे वेळापत्रक अधिकृत वेबसाईटवर पाहता येणार आहे.
इंस्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाऊंट्स ऑफ इंडिया कडून याआधी परीक्षा 9 आणि 11 नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार होत्या. मात्र अयोद्धा सुनावणीमुळे परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. आता या परीक्षा 19 आणि 20 नोव्हेंबर दिवशी घेतली जाणार आहे. या परीक्षेचे नवं वेळापत्रक ICAI ची अधिकृत वेबसाईट http://icai.org/ वर अपडेट करण्यात आलं आहे.
19 नोव्हेंबरला या परीक्षा?
फाउंडेशन पेपर वन (Principles and Practices of Accounting), फायनल ओल्ड स्कीम ग्रुप 2, पेपर 5 (Advanced Management Accounting), फायनल न्यू स्कीम ग्रुप 2 पेपर 5 (Strategic Cost Management and Performance Evaluation), IRM टेक्निकल एक्झामिनेशन पेपर 1 (Principles and Practice of Insurance.), INTT पेपर 1 (International Tax and Transfer Pricing).
20 नोव्हेंबरला या परीक्षा?
IPC ओल्ड स्कीम, ग्रुप 2 पेपर 5 (Advanced Accounting), IPC न्यू स्कीम ग्रुप 2 पेपर 5 (Advanced Accounting) या विषयांच्या परीक्षा 20 नोव्हेंबर 2019 दिवशी होणार आहेत.याशिवाय अन्य कोणत्याच परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आलेले नाहीत. त्याचे अपडेट्स वेळोवेळी अधिकृत वेबसाईट्सवर दिले जात आहेत.