Ads
लाईफस्टाईल

महिलांनी अशी करावी स्वतःची स्वरक्षा !

डेस्क बातमीदार

घराबाहेर वावरताना महिलांना अनेकदा छेड़छाडीसह विविध घटनांना सामोरे जावे लागते. अशावेळी महिलांनी आपली स्वरक्षा कशी करावी, यासाठी बातमीदार महिलांसाठी काही टिप्स घेऊन आलाय. या टिप्स मार्शल आर्टस् ट्रेनरने दिलेल्या आहेत.

खालीलप्रमाणे टिप्स

◼ जर एखाद्याने आपला हात धरला असेल तर त्याच्या हाताची दोन- दोन बोटं अपोझिट दिशेने खेचून घ्या. त्यानंतर, एका हाताची बोटं घश्याजवळ दाबा.

◼ कोणी तुम्हाला पुढच्या भागातून पकडत असेल तर तुमच्या डोक्यासमोरील नाक जोरदारपणे दाबा. जसजसे तो असंतुलित होईल तसतसे त्याच्या पायाच्या गुडघासह त्याच्या मानेवर हल्ला करा. याने समोरील व्यक्ती असह्य होईल.

◼ जर कोणी आपल्याला पुढच्या भागातून पकडले आणि आपली लांबी कमी असेल तर एका हाताने थांबवा आणि दुसऱ्याने ठोसावर हल्ला करा. जेव्हा तो असंतुलित होईल तेव्हा लगेच त्याच्या गुडघ्यावर हल्ला करा.

◼ जर कोणी मनगट धरले तर आपला हात घड्याळाच्या दिशने फिरवा. यामुळे हाताची पकड लूज होईल आणि हात सहज सुटेल.

◼ जर कोणी आपल्याला मागच्या बाजूने पकडले तर प्रथम त्याच्या चेहऱ्यावर हल्ला करा. यामुळे तो गोंधळून जाईल आणि मग त्वरित खाली वाकून त्याच्या गुडघ्यावर हल्ला करा. आता त्याचा एक पाय धरून वर उचलून घ्या असे केल्याने, तो जमिनीवर पडेल.

◼ कुणीतरी आपल्याला एका बाजूने पकडल्यास, त्याच बाजूच्या हाताच्या कोपऱ्याने चेहऱ्यावर हल्ला करा. तो असंतुलित होईल, मग त्याचे दोन्ही हात धरून पूर्ण शक्तीने कोपरा त्याच्या पोटावर मारा.

About the author

बातमीदार

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: