आज १ मार्चपासून सर्वसामान्यांना मिळणाऱ्या विविध सेवांमध्ये बदल होणार आहेत. त्यानुसार काही बँका गृहकर्ज तर आयकर विभागातील सेवामध्ये किंचितसा बदल होणार.
पीएनबी व इलाहाबाद बँकेचं गृहकर्ज स्वस्त झालेय. पीएनबीचं गृहकर्ज आजपासून ०.१० टक्के कमी झाले. त्यानुसार व्याज दर ८.५५ वरून ८.४५ टक्के झाले. तसेच इलाहाबाद बँकेचे गृहकर्ज ०.१० टक्क्यांनी कमी झाले असून आता नवे दर ८.१५,८.२५,८.४५,८.५०,८.६५, आणि ८.९५ टक्के आहेत.
प्राप्तिकर विभागातर्फे आजपासून ‘ई-रिफंड’ देण्यात येणार. हे रिफंड (परतावा) संबंधित करदात्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार असून यासाठी बँक खाते पॅन कार्डशी जोडणे बंधनकारक.
LIC आता डिजिटल होत असून पाॅलिसीधारकांना सगळी माहिती आता SMS वर मिळू शकणार आहे. मात्र यासाठी तुमचा फोन नंबर रजिस्टर्ड असणे आवश्यक.