मुंबई – सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ केलीय. यामुळे सामान्य ग्राहकांच्या खिशाला कात्री बसणार. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने दिलेल्या माहितीनुसार वाढत्या इंधन दरवाढीमुळे अनुदानित असणाऱ्या घरगुती गॅस सिलिंडरची किंमत २.०८ रुपये आणि विनाअनुदानीतसाठी ४२.५० रुपयांनी महाग झालाय.
मुंबईतल ग्राहकांना अनुदानित गॅस सिलिंडरसाठी ४९३.३२ रुपये आणि विनाअनुदानित सिलिंडरसाठी ६७३.५० रुपये मोजावे लागणार.