अक्षय कुमार हा दोन गर्भवती महिलांमध्ये फसला असून त्याच्याकडे लवकरच ‘गुड न्यूज’ असणार असल्याची चर्चा आता जोरदार सुरु झाली आहे. ही गुड न्यूज त्याच्या घरी नाही तर त्याचा आगामी चित्रपटातून दिसून येणार आहे. गुड न्यूज या चित्रपटाचा पोस्टर नुकताच रिलिज करण्यात आला. त्यामध्ये दोन गर्भवती महिला सुद्धा दिसून येत असून त्यापैकी एक करिना कपूर आणि दुसरी म्हणजे कियारा अडवणी आहे. या चित्रपटाचे पोस्टर अक्षय कुमार याने ट्वीट केले आहे.
The goof-ups are bound to multiply…and that's how you get, #GoodNewwz!😀
Coming to you this #Christmas,27th December.#KareenaKapoorKhan @diljitdosanjh @Advani_Kiara @karanjohar @apoorvamehta18 @ShashankKhaitan @raj_a_mehta @NotSoSnob @ZeeStudios_ @DharmaMovies #CapeOfGoodFilms pic.twitter.com/Sy7vN7y1q8— Akshay Kumar (@akshaykumar) November 14, 2019
पोस्टर कसे आहे?
या पोस्टरवर एका बाजूला करिना कपूर तर दुसऱ्या बाजूला कियारा अडवणी दिसत आहेत. या दोघीही प्रेग्नन्ट असलेल्या दाखवण्यात आलं आहे.एकीकडे करिना कपूर तर दुसरीकडे कियारा अडवाणी दिसत असून या दोघींच्या मध्ये दिलजीत दोसांझ आणि अक्षय कुमार दिसत आहे. दरम्यान, राज मेहता दिग्दर्शित हा चित्रपट 27 डिसेंबरला रिलीज होणार आहे.