मराठमोळ्या मायभूमीतून जन्मलेल्या मात्र कन्नड, तमिळसह विविध 15 भाषांमधून गाऊन आपल्या संगीताची छाप सोडून घराघरात पोहोचलेल्या झी सारेगमपा लिटील चॅम्पची फायनलीस्ट आस्था लोहारशी आज बाल दिनानिमित्त खास गप्पा मारून संगीत जगतातला प्रवास जाणून घेतला.
आस्था लोहार या चिमुरडीला या 15 भाषा अवगत नसतानाही ती बेभान गाते. मुळात हे तितकस सोपे नाही आहे मात्र तिच्यातल्या त्या कला वाखान्याजोगी आहे. प्रत्येक ओळीचा अर्थ समजून त्यांनतर त्या शब्दाप्रमाने गाणे हे या वयात सोपे नाही. त्यामुळे तिच्यातली हि काल नक्कीच इतर मुला-मुलींसाठी प्रेरणादायी आहे.
आस्थाने संगीत जगतातील दिग्गज गायकांबरोबर गान गायले आहे, कोतुकाची थाप मिळवली आहे. जेष्ठ गायिका लता मंगेशकर यांनी तिच्या गायकीचे कौतुक केले आहे. तसेच बॉलीवूड मधील 70 च्या दशकातील गाणे संगीतबद्ध करणारी बेस्ट जोडी असलेली कल्याणजी आनंदजी यांचे हि तिला मार्गदर्शन लाभले आहे. त्याचबरोबर संगितकार अशोक पत्की यांच्या सोबत तिने स्टेज देखील शेअर केला आहे. त्यामुळे जितकी ती चिमुरडी दिसत असली तर तिचा संगीतात कोणी हात पकडू शकत नाही इतक मात्र नक्की.