बहुचर्चीत असा ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटातील अभिनेता अजय देवगण ह्याचा लूक नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अजयने तान्हाजी मालुसरेंची भूमिका साकारली आहे. तान्हाजी मालुसरे यांच्या पराक्रमावर हा चित्रपट आधारित आहे. शिवाजी महाराजांच्या सैन्यातील तान्हाजी हे अत्यंत विश्वासू आणि पराक्रमी साथीदार होते त्यामुळे शिवाजी महाराजांच्या इतिहासात त्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.
लूकमध्ये काय?
तरूण आदर्श यांनी पोस्ट केलेल्या लूक मध्ये अजय देवगण हाती तलवार घेऊन भेदक नजरेने पाहात आहे. तसेच त्यांनी पोस्ट शेअर करताना स्वराज्य से बढकर क्या? अशी टॅगलाइन दिली आहे. प्रदर्शनाच्या पहिलेच चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. ‘तान्हाजी’ हे नाव ठेवल्यामुळे सर्वत्र समाजमाध्यमांमध्ये टिका होत होती. मात्र, मालुसरे यांच्या वंशापासून ते इतिहास अभ्यासकांनी मूळ नाव हे तान्हाजी असल्याचे सांगितले. त्यांमुळे तान्हाजी नाव बदलल्यातचे चित्रपट कर्त्यांनी सांगितले.
Trailer on 19 Nov 2019… New poster of #Tanhaji: The Unsung Warrior… Directed by Om Raut… 10 Jan 2020 release. #TanhajiTheUnsungWarrior #TanhajiTrailerOnNov19 pic.twitter.com/YnoHFlWkQj
— taran adarsh (@taran_adarsh) November 12, 2019
दरम्यान, या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे. चित्रपटात राजपुत किल्लेदार उदयभान राठोड यांची भूमिका सैफ अली खान साकारणार आहे, तसेच तान्हाजी मालासुरे यांच्या पत्नीते काम काजोल करणार असल्याचे बोलले जात आहे. अद्याप इतर व्यक्तीरेखा गुलदस्त्यात आहेत.चित्रपटाचा ट्रेलर येत्या 19 नोव्हेंबरला लाँच होणार असून 10 जानेवारी 2020 ला सर्वत्र पदर्शित होणार आहे.