Ads
बातम्या

‘पानिपत’चा ट्रेलर पाहून राज ठाकरे म्हणतात..

डेस्क desk team

ऐतिहासिक चित्रपट दिग्दर्शनातील मोठं नाव आशुतोष गोवारीकर यांचा नवा कोरा सिनेमा ‘पानिपत – द ग्रेट बेट्रेयल’  येत्या डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात प्रदर्शित होणार आहे. अलीकडेच सोशल मीडियावरून या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलर मधून संजय दत्त  क्रिती सनॉनआणि अर्जुन कपूर यांचे ऐतिहसिक अंदाज पाहायला मिळाले.  या ट्रेलरवरून येणाऱ्या संमिश्र प्रतिक्रियांमध्ये नेटकऱ्यांनी अर्जुन कपूरने साकारलेली सदाशिवरावांची भूमिका इथपासून ते सिनेमाच्या ट्रेलरवरून कथानकाचा येणार अंदाज या साऱ्यावर आक्षेप घेतले होते.  तर दुसरीकडे ,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मात्र आश्चर्यकारक टिपण्णी केली आहे. राज यांनी केलेल्या ट्विट मधून त्यांनी सिनेमाचे कौतुक करत प्रदर्शनासाठी शुभेच्छा दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावत आहेत.

राज ठाकरे यांच्या ट्विट मध्ये “दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचा मराठा साम्राज्याच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाच्या लढाईवरचा ‘पानिपत’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच पाहिला. ट्रेलरच इतका सुंदर आहे की चित्रपटाची लढाई आशुतोष जिंकणार याची खात्री आहे.” असे म्हणत या ट्रेलरसोबतच चित्रपटदेखील पाहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, अटकेपार झेंडा गाडणाऱ्या पानिपतचा युद्धाची महती मांडणारा हा चित्रपट असणार आहे. कथानकावर होणारी आक्षेप बाजूला सरल्याससिनेमामधून भव्य दिव्य असे रूप साकारले जाणार आहे हे निश्चित. या चित्रपटात अफगाणिस्तानचा शासक अहमद शहा अब्दालीच्या भूमिकेत संजय दत्त व पार्वतीबाईंच्या रूपात क्रिती सनॉन दिसणार आहेत. हा बहुचर्चित सिनेमा 6 डिसेंबर रोजी प्रदर्शित होईल.

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: