कामाची गरज आहे म्हणून व्हिजिटिंग कार्ड काढलेल्या गीता काळे मावशींना सोशल मीडियाने जगभरात पोहोचवलं आहे. व्हिजिटिंग कार्डमुळे या मावशी रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आल्या सध्याच्या स्थितीत त्यांना कामासाठी एवढे फोन येत आहेत की गेल्या दोन दिवसांपासून त्यांनी फोन बंद ठेवला आहे.
गीता काळे या मुळच्या कर्नाटकमधील गुलबर्ग्या येथील आहे.पुण्यात काम मिळवण्यासाठी संपर्क कसा वाढवायचा, हा प्रश्न होता. त्यामुळं त्यांनी हा प्रयोग केला.
मावशी म्हणाल्या..
मी अस्वस्थ होते. धनश्री शिंदे मॅडम यांच्या घरी काम करताना त्यांना मी माझी अडचण सांगितली. त्यानंतर त्यांनी माझ्यासाठी एक व्हिजिटिंग कार्ड तयार केले. त्यांनीच व्हिजिटिंग कार्ड सोशल मीडियावर शेअर केले, व आज मला कामे मिळू लागली.