सध्याचे युग हे विज्ञानाचे युग आहे. त्यामुळे विज्ञानाच्या मदतीने दररोज नवनवे शोध लागत असतात. या शोधांचे महत्व आणि त्याचा उपयोग जगातील प्रत्येक व्यक्तीला मिळावी यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ, सांस्कृतिक, वैज्ञानिक, शौक्षणिक संघटनेने 10 नोव्हेंबर हा दिवस जागतिक विज्ञान दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरवले. यानिमित बातमीदारतर्फे जागतिक विज्ञान दिवसाच्या शुभेच्छा!
भारतात या दिवशी होतो साजरा
भारतात 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. प्रसिद्ध वैज्ञानिक डॉ. सिव्ही रमन यांनी आपले शोध 1928 साली जगापुढे मांडले. म्हणून त्या निमित्ताने 28 फेब्रुवारीला भारतात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो. जगात अनेक ठिकाणी या दिवशी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. 1999 साली आंतराष्ट्रीय स्तरावर हंगेरिच्या बुडापेस्ट शहरात सर्व प्रथम संयुक्त राष्ट्रसंघाकडुन वैज्ञानिक दिन आयोजित करण्यात आला. यानंतर व्यापक स्वरुपात जागतिक स्तरावर 2001 साला पासून वैज्ञानिक दिवस साजरा करायला सुरवात झाली.
भारतरत्न सी.व्ही.रामन
1987 साली प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि देशाचे विज्ञान तंत्रज्ञान मंत्री डॉ. वसंत गोवारीकर यांनी विज्ञान जनजागृतीपर अनेक योजना सुरु केल्या. तसेच वैज्ञानिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्द्ल नोबेल पुरस्कार विजेते भारतातील एकमेव व्यक्ती सी.व्ही रामन यांच्या स्मृती प्रित्यर्थ भारतात राष्ट्रीय विज्ञान दिवसाला सुरवात झाली. जागतिक स्तरावर विज्ञान दिवस सुरु होण्या आधी भारतात राष्ट्रीय स्तरावर याची सुरवात झाली होती हे महत्वाचे. शांती व विकासासाठी विज्ञानाचे महत्व हा सगळ्या मागचा हेतु आहे.