पंकज राणे – भारतीय क्रिकेट संघाचा यशस्वी कर्णधार विराट कोहलीचा आज 31 वा वाढदिवस. विक्रमांच्या यथेच्छ शिखरावर पोहोचणारा व यशाची अनेक शिखरे गाठणारा कोहली अजूनही अनेक विक्रम रचण्यासाठी आजही उत्साही आहे हे विशेष. आज त्याच्या वाढदिवसानिमित बातमीदारच्या त्याला विराट शुभेच्छा. यानिमित्त त्याच्या कारकिर्दीवर एक नजर टाकुयात…
जन्म व शिक्षण
- जन्म 5 नोव्हेंबर 1988 दिल्लीत पंजाबी कुटुंबात झाला. प्राथमिक शिक्षण दिल्लीत भारती पब्लिक स्कूलमध्ये झाले.
वैयक्तिक आयुष्य
- विराटचे टोपण नाव चिकू आहे.
- वडील प्रेम कोहली वकील होते.
- आई सरोज कोहली या गृहिणी आहे.
- विराटला टॅटू काढण्याची आवड असून त्याच्या हातावर Golden Dragon Tatto आहे.
- बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माशी तो 11 डिसेंबर 2017 रोजी विवाहबद्ध झाला.
क्रिकेटमध्ये पदार्पण
- 1998 मध्ये वयाच्या 9 व्या वर्षी दिल्लीतील अकॅडमीत भरती झाला.
- 2008 च्या अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये विराट भारतीय टीमचा कॅप्टन होता.
- भारतातर्फे सर्वात जलद शतक बनवण्याचा रेकॉर्ड विराटच्या नावे आहे.
- 2014 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना विराटने 4 कसोटी सामन्यांमध्ये 4 शतकांच्या मदतीने 692 धावा बनवल्या होत्या.
- त्यानंतर विराटला कसोटी संघाचा कर्णधार बनवण्यात आले.
- जानेवारी 2017 मध्ये विराटला तीनही फॉरमॅटच कॅप्टन बनवण्यात आले.
कर्णधार म्हणून विक्रम
- त्याने पहिल्या तीन कसोटी डावांत शतके केले.
- परदेशात द्विशतक करणारा तो पहिला भारतीय कर्णधार आहे.
- एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने सर्वात जलद 1000 धावा पूर्ण केल्या आहेत.
- ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकणारा तो पहिला भारतीय कर्णधार आहे.
18 नंबर जर्सीचं कनेक्शन :-विराट नेहमी 18 नंबरची जर्सी घालून मैदानात उतरतो. याबद्दल विराटने एका मुलाखतीत सांगितलं होतं. विराटचे जेव्हा अंडर 18 साठी भारतीय संघामध्ये निवड झाली तेव्हा त्याला 18 क्रमांकाची जर्सी देण्यात आली.त्यानंतर विराट कोहलीच्या वडिलांचे निधनही 18 डिसेंबरला झाले. हळूहळू विराटच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या घटनांचा 18 क्रमांकांशी संबंध आला. त्यामुळे कळत नकळत 18 क्रमांकाचा प्रभाव असल्यानेच हा क्रमांक कायम जर्सीवर ठेवला आहे.
प्राप्त पुरस्कार
अर्जुन पुरस्कार I खेलरत्न पुरस्कार