वसई-विरार शहर महापालिकेने शहरात मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी सुरु केलेल्या गॅस दाहीन्यांची दुरावस्था झाली आहे. जवळपास गेल्या चार वर्षापासून या गॅस दाहीन्या धुळखात पडल्या आहेत. त्यामुळे सामान्य करदात्यांचे लाखो रुपये वाया जात असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. पालिका मात्र या गॅस दाहीन्याच्या दुरावस्थेला नागरिकांना जबाबदार ठरवत आहे.
वसई विरार महापालिका क्षेत्रातील नालासोपारा पूर्व येथील आचोळे स्मशानभूमीत आणि नालासोपारा पश्चिम येथील समेळपाडा स्मशानभूमीत गॅस दाहीन्या लाखो रुपये खर्च करून लावण्यात आल्या होत्या. यामागे पर्यावरणाचा विचार करून ह्या दाहीन्या बसविण्यात आल्या होत्या. पण केवळ वर्षभरातच या गॅस दहीन्या बंद पडल्या. यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली.
सद्यस्थितीत समेळ पाडा येथील गॅस दहीनीच्या सहाय्याने 118 अंत्यसंस्कार करण्यात आले तर आचोळे येथील गॅस दहीनीत 98 अंत्यसंस्कार करणायत आले आहेत. पं मागील चार वर्षापासून या दाहीन्या बंद असूनही पालिकेने कोणतीही दखल घेतली नाही.
याबाबत महापालिकेला विचारणा केली असता त्यांनी लोक या दहीन्या वापरत नसल्याने त्या खराब झाल्या आहेत. वापर होत नसल्याने त्यावर खर्च करणे वायफळ आहे. यामुळे लोकांनी त्याचा वापर करणे महत्वाचे आहे.
गॅस दहीनी वापराबाबत लोकांमध्ये लोकामध्ये अनेक संभ्रम आहेत. धार्मिक विधीनुसार पारंपारिक पद्धतीने लाकडावर अंत्यसंस्कार करण्याकडे लोकांचा कल असल्याने या दाहीन्याचा वापर होत नसल्याचे सामाजिक कार्यकर्ते राज दोसांनी यांनी सांगितले. तर या दाहीन्यां महापालिकेने तातडीने दुरुस्त करून त्यांच्या वापरासाठी जनजागृती करणे गरजेचे असल्याचे मत शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रवीण म्हापळकर यांनी व्यक्त केले आहे.