Ads
बातम्या

पुष्पक एक्स्प्रेसचा डबा घसरला; मनमाडकडे जाणारी वाहतूक विस्कळीत

डेस्क desk team

इगपतपुरी  रेल्वे स्थानकावर मुंबई लखनऊ पुष्पक एक्सप्रेचा शेवटचा डब्बा रुळावरुन घसरल्याने मनमाकडे  जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. आज शनिवारी सकाळी ही घटना घडली आहे. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. रेल्वे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेवून डब्ब्यातील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. सध्या युद्धपातळीवर डब्बा जोडणीचे काम सुरु असून या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे.

इगतपुरी स्थानकावर आज सकाळी अकरा ते सव्वा अकराच्या दरम्यान पुष्पक एक्सप्रेसचा शेवटचा जनरल डब्बा घसरल्यामुळे प्रवाशांनी एकाच गर्दी केली होती. दिवाळीच्या निमित्ताने मुंबई ते मनमाड असा प्रवास करणाऱ्या लोकांच्या अडचणीत भर पडली आहे. इगतपुरी स्थानकावर घडलेल्या अपघातामुळे प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, डब्बा जोडण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. तसेच ही रेल्वे लवकरच पुढील मार्गाकडे रवाना होईल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

आज घडलेली दुसरी घटना असून सकाळी कल्याणहून ठाण्याकडे जाणाऱ्या रेल्वेरूळाला तडे गेल्याने मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे अधिकच हाल झाले आहेत. सध्या पार्सिक बोगद्याजवळ जलद मार्गावर रुळ दुरस्तीचे काम जोरात सुरु आहे. काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरील वाहतूक पुन्हा सरु होईल, असेही मध्य रेल्वेने सांगितले आहे. तसेच प्रवाशांची होणाऱ्या गैरसोयीबदल दिलगिरी व्यक्त केली आहे.

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: