दिवाळी सणानिमित्त गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वेने मोठी घोषणा केली आहे. या घोषणेने चाकरमान्यांचा प्रवास सुलभ होणार आहे. दिवाळीनिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी सोडलेल्या मध्य रेल्वे मार्गावरील विशेष एक्स्प्रेस फुल झाल्या आहेत. त्यामुळे कोकण रेल्वेने 23 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर दरम्यान तुतारी एक्स्प्रेसच्या स्लीपर तसंच जनरल डब्यांमध्ये वाढ केली आहे.
तुतारी एक्स्प्रेसही ऐनवेळी 15 कोचेसची धावते. मात्र दिवाळीनिमित 19 कोचची करण्यात आली आहे. यामध्ये स्लीपरचा एक डबा तर 3 जनरल डब्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. अप, डाऊन अशा दोन्ही मार्गावर डब्यामध्ये वाढ करण्यात आली आहे.दरम्यान या दिवाळीत आजपासून कोकणात जाण्याच्या तयारीत असणाऱ्यांना या सेवेचा लाभ मिळणार आहे. तसेच या वाढत्या कोचमुळे प्रवाशांना गर्दीतून सुटका होण्याची शक्यता आहे.
जादा गाड्या
दिवाळीनिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी जादा विशेष गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. 25 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबरदरम्यान लोकमान्य टिळक टर्मिनसहून दर शुक्रवारी रात्री 1.10 वाजता करमळीसाठी गाडी सोडण्यात येईल. ही गाडी त्याच दिवशी दुपारी 1.30 वाजता पोहोचेल. तर करमळीहून दर शुक्रवारी 2 वाजता सुटणारी गाडी लोकमान्य टिळक टर्मिनसला पहाटे 3.40 वाजता पोहोचेल.