पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहन धारकांसाठी महत्वपूर्ण बातमी आहे. आज एक्स्प्रेस-वे दोन तासांसाठी बंद असणार आहे.ओव्हरग्रेड गँन्ट्री बसविण्याच्या कामासाठी पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर आज दुपारी १२ ते २ दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. या दोन तासांच्या कालावधीत मुंबईकडून पुण्याकडे येणारा मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे.
मार्गात बदल
- ब्लॉकच्या कालावधीत सर्वच प्रकारची अवजड व मालवाहतूक करणार वाहने खालापूर व कुसगाव टोलनाक्याच्या अलीकडे थांबविण्यात येणार आहेत.
- हलकी चारचाकी व इतर प्रवासी वाहने कुसगाव टोलनाका येथून जुना मुंबई-पुणे महामार्गाद्वारे पुण्याकडे वळविण्यात येणार आहे.