Ads
राजकीय घडामोडी

सोपाऱ्यात बोगस मतदान; खऱ्या मतदारांचा मतदानाचा हक्कच हिरावला !

voter
डेस्क desk team

प्रशांत गोमाणे : नालासोपारा विधानसभा मतदारसंघात असंख्य मतदान केंद्रावर बोगस मतदान झाल्याची माहिती हाती आली आहे. या घटनेमुळे नालासोपारा मतदारांमध्ये संतापाचे वातावरण आहे. मात्र या घटनेमुळे अस्सल मतदारांची चांगलीच पंचाईत झाली. विशेष म्हणजे बहुजन विकास आघाडीने निवडणुकीआधीच नालासोपारा मतदारसंघात असंख्य बोगस मतदार असल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली होती.या अनुषंगाने आज अनेक ठिकाणी बोगस मतदान झाल्याचे निदर्शनास आले. यामुळे अनके मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता आला नाही.

नालासोपारा विधानसभेत अनेक मतदान केंद्रावर काही मतदारांनी इतर मतदार संघातून येऊन बोगस पद्धतीने मतदान केले. नालासोपारा पश्चिमेच्या राजीव गांधी, नारायणी, रायन इंटरनेशनल, राहुल इंटरनेशनल स्कूल या मतदार केंद्रावर असेच प्रकार पाहायला मिळाले. या संदर्भात नवनाथ पगारे यांनी निवडणूक प्रतिनिधीकडे लेखी तक्रार केली आहे.

नालासोपाराच्या रायन इंटरनेशनल स्कूलमध्ये वसिम सलीम शेख नामक व्यक्तीने बोगस मतदान केले. या मतदराचे नाव १६२ मालाड विधानसभा क्षेत्रात, १२० अंधेरी पश्चिम विधानसभा क्षेत्रात तसेच १६८ चांदिवली मतदार क्षेत्रातील मतदान यादीत नाव असल्याचे आढळले. त्याच्याकडे तिन्ही मतदार संघातील मतदार ओळखपत्र आढळून आले. त्याने बोगस मतदान केल्याचे कळताच त्याला नालासोपारा पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

दरम्यान निवडणुकीआधीच बहुजन विकास आघाडीने नालासोपारा मतदार संघात मोठ्या प्रमाणात बोगस मतदार असल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली होती. मात्र या तक्रारीकडे निवडणूक आयोगाने गांभीर्याने न घेतल्याने खऱ्या मतदारांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही.

बॅलेट पेपर मतदान

नालासोपारा विधानसभा मतदार संघात काही खऱ्या मतदारांच्या जागी बोगस मतदान करण्यात आले होते. त्यामुळे त्या मतदारांची पंचाईत झाली होती. सोपारा इंग्लिश स्कूल मतदान केंद्रावर नाव असलेल्या हस्सान सरगुरोह यांच्या नावेने आधीच मतदान झाल्याने त्यांचे मतदान बॅलेट पेपरवर घेण्यात आले. अशीच घटना राहुल इंटरनेशनल स्कूल मतदान केंद्रावरही समोर आली. यावेळीही बोगस मतदान पडलेल्या आत्माराम शांताराम पवार या मतदाराचे बॅलेट पेपरवर मतदान झाले.

नालासोपारा विधानसभा मतदार संघात बोगस मतदान झाल्याचे वृत्त नालासोपारा पोलिसांनी फेटाळले आहे. तसेच ज्या बोगस मतदाराला ताब्यात घेण्यात आले होते. त्याने मतदान केले नाही आहे. मात्र त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करून त्याला सोडण्यात आले.

-वसंत लब्दे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नालासोपारा

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: