संपूर्ण राज्यात आज सकाळपासून 288 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडायला सुरूवात झाली आहे. सामान्य नागरिक, नेते मंडळीसह सिनेसृष्टीतील कलाकारही सकाळपासून उत्साहात मतदान करण्यास बाहेर पडताना दिसत आहे. तसेच या मतदानासाठी दिग्गजांकडून जबाबदार नागरिकांना घराबाहेर पडून मतदान करण्याचे अवाहन ही केले जात आहे.
राष्ट्रवादी नेता नवाब मलिक यांनीही बजावला मतदान हक्क
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त ज्युलिओ रिबेरो यांनी वरळीमध्ये केले मतदान
Former Mumbai Police Commissioner Julio Ribeiro after casting his vote for the Worli Assembly constituency. #MaharashtraAssemblyPolls pic.twitter.com/J1kMViiwkr
— ANI (@ANI) October 21, 2019
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नी बजावला मतदानाचा हक्क
उदयनराजे भोसले यांनी सातारामध्ये सकाळी आपल्या परिवारा सोबत बजावला मतदानाचा हक्क
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ताडदेव येथील महापालिका शाळेत बजावला मतदानाचा हक्क
अजित पवार यांनी आज बारामती तालुक्यातील काटेवाडी येथे सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला आहे.
दिग्गज क्रिकेट पटू सचिन तेंडुलकर यांनी वांद्रेमध्ये सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला आहे
Mumbai: Sachin Tendulkar, wife Anjali and their son Arjun after casting their vote at a polling booth in Bandra (West). #MaharashtraAssemblyPolls pic.twitter.com/SCMPcCOy03
— ANI (@ANI) October 21, 2019
राज्याचे गृहनिर्माण राज्यमंत्री व जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदार संघात महायुती उमेदवार रवींद्र वायकर यांनी बजावला मतदानाचा हक्क
रितेश आणि जेनेलिया देशमुख यांनी आईसह बजावला मतदानाचा हक्क
पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क
वयाच्या 97 व्या वर्षी पुण्यातील पर्वती येथे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी बजावला मतदानाचा हक्क
गोरेगावच्या भाजप उमेदवार विद्या ठाकूर यांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी बजावला मतदानाचा हक्क
उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी बजावला मतदानाचा हक्क
पुणे शहराच्या महापौर मुक्ता टिळक यांचे सहकुटुंब मतदान
नागपूरमध्ये नितिन गडकरी यांनी आपल्या कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क
राधाकृष्ण विखे पाटलांच्या सहकुटुंबाने बजावला मतदानाचा हक्क
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर येथे कुटुंबीयांसह केलं मतदान
आशिष शेलार यांनी बजावला मतदानाचा हक्क
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सकाळीच मतदान केले आहे.
ठाण्यातील मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क
शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊच यांनी बजावला मतदानाचा हक्क
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा अधिकार