Ads
ब्लॉग्स

प्रकाशमय आणि उत्साहाने भरलेली दिवाळी  

diwali festival celebration
डेस्क desk team

भारतात साजरे केले जाणाऱ्या सणांमध्ये सर्वात आनंददायी आणि महत्वाचा उत्सव म्हणजे दिवाळी. भारतात सर्व धर्मीय नागरिक हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात. दिवाळी हा सण आश्विन महिन्याच्या शेवटी म्हणजे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये साजरा केला जातो. दरवर्षी दिपावली या सणाच्या दिवशी रात्री जगमगते दिवे,  आकाश कंदील आणि फटाक्यांच्या रोषनाईनीत साजरी केली जाते. दिवाळीत सर्वत्र प्रकाशमय वातावरण पसरलेले असते. दिवाळीमध्ये तोरण व झेंडूच्या फुलांचे तोरण मुख्यप्रवेश द्वारावर लावले जातात. अंगणात वेगवेळ्या रंगांच्या रांगोळ्या काढून सण साजरा करण्यासाठी येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करतात.

काही लोकांची अशी श्रद्धा आहे की, चौदा वर्षाचा वनवास संपवून श्रीराम सीतेसह अयोध्येला परत आले होते म्हणून तो दिवस दिवांच्या प्रकाशात आनंदात साजरा करण्यात आला होता. हिंदू धर्मातील लोक दिवाळीत नवीन वस्तू व सोने खरेदी करणे अत्यंत शुभ मानतात. लोक सोने चांदी खरेदी करतात. या सणा दरम्यान फारच उत्साहाचे वातावरण असते. भारतात वेगवेगळ्या धर्माचे लोक आपल्या चालीरीतीप्रमाणे हा सण साजरा करतात त्यामुळे या सणा दरम्यान प्रत्येकाच्या घरी आनंद आणि उत्साहाचे वातावरण असते.

लोक एक आठ्वड्याआधीच दिवाळीची तयारी करायला सुरुवात करातात. घराची साफसफाई केली जाते, तर काही घरांमध्ये रंग देण्याचे काम चालू असते. दिवाळी येण्याच्या आधीच कपड्यांची खरेदी केली जाते. दिवाळी हि पाच दिवसामध्ये साजरी करण्यात येते. धनत्रयोदशी, नरकचतुर्दर्शी, लक्ष्मीपूजन,  पाडवा,  भाऊबीज अशी पाच दिवसात साजरी केली जाते. पण जर हीच दिवाळी जर इकोफ्रेडंली केली तर हवामान फटाक्यांनी प्रदूषित होणार नाही.

सानिया शेख,  9  वी ( साईनाथनगर स्कूल, घाटकोपर )

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: