अभिनेता अंकुश चौधरीचा आगामी चित्रपट ‘ट्रिपल सीट’ चा दमदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटात अंकुशसोबत बिग बॉस फेम शिवानी सुर्वे, पल्लवी पाटील, प्रवीण तरडे, योगेश क्षीरसाठ आदी कलाकार झळकणार आहेत.
एका मिस कॉल नंतर आयुष्यात काय-काय होऊ शकतं? ते सगळं ट्रेलरमध्ये दिसतं, तसेच चित्रपटात प्रेमाचा ट्रँगल असल्याचे दिसत आहे. भन्नाट ट्रेलर पाहता शेवटी काय? हा प्रश्न उभा राहतो. हा सिनेमा दिवाळीत 25 ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
ट्रेलर पहा