कोकण रेल्वेत नोकर भरत जाहीर करण्यात आली आहे. ही भरती ट्रेनी अप्रेंटिस या पदासाठी असणार आहे. तसेच एकूण 135 जागांसाठी भरती ठरविण्यात आली आहे.
पद आणि जागा
ट्रेनी अप्रेंटिस मधील शाखा BE (सिव्हिल) यापदासाठी 30 जागा, BE (इलेक्ट्रिकल ) पदासाठी 30 जागा, BE (इलेक्ट्रॉनिक्स आणि टेली कम्युनिकेशन) पदासाठी 18 जागा, BE (मेकॅनिकल) पदासाठी 5 जागा, डिप्लोमा (सिव्हिल) साठी 24 जागा आणि डिप्लोमा (इलेक्ट्रिकल) साठी 28 जागा अशा एकूण 135 जागांसाठी भरती असणार आहे.
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा
संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी किंवा डिप्लोमा असणे गरजेचे आहे. तसेच 21 ते 25 वयोमर्यादा असून SC/ST साठी 5 वर्षाची आणि OBC साठी 3 वर्षांची सूट देण्यात आली आहे.
शुल्क
कोकण रेल्वे हे कार्यक्षेत्र असणार आहे. General/OBC साठी 100 रुपये तर SC/ST/EWS/PWD/अल्पसंख्यक/महिलांसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात आलेले नाही. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 नोव्हेंबर 2019 असणार आहे. तर अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2019 आहे.
अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता
Assistant Personnel Officer II, Konkan Railway Corporation Ltd, 4th Floor, Belapur Bhavan, CBD Belapur, Navi Mumbai-400614