ठाणे शहर विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादीच्या सुहास देसाई यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. पक्षाच्या आदेशामुळे त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे मनसेच्या अविनाश जाधव यांना त्याचा फायदा होणार आहे. सुहाल देसाई यांनी माघार घेतल्याने आता भाजपच्या संजय केळकर आणि मनसेच्या अविनाश जाधव यांच्यात थेट रंगतदार लढत पाहायला मिळणार आहे.
नाशिक मनसे उमेदवाराची माघार
विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस असून, नाशिकमध्ये मनसेने राष्ट्रवादीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिक पूर्वमधून अशोक मुर्तडक यांना मनसेने अधिकृत उमेदवारी दिली होती. मात्र आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊन राष्ट्रवादीला पाठिंबा देण्याच त्यांनी ठरवलय.
आघाडीला फायदा
मतांचे विभाजन टाळण्यासाठी ते उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत. नाशिक पूर्वमध्ये बाळासाहेब सानप यांना आघाडी कडून उमेजवारी देण्यात आली आहे. दरम्यान, मनसे उमेदवाराने माघारा घेतल्याने त्या ठिकाणी बाळासाहेब थोरात यांचा मार्ग मोकळा झाला असून आघाडीला त्याचा फायदा होणार आहे. दरम्यान, प्रत्यक्ष आघाडीत नसले तरी मनसे आणि राष्ट्रवादीचे अनेक मतदार संघांमध्ये साट लोट झाल्याच पाहायला मिळत आहे.