मनसेच्या वाहतूक सेनेचे प्रमुख असलेले नितीन नांदगावकर यांनी शिवबंधन हाती बांधले आहे. मनसेकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जातेय.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाहतूक सेना सरचिटणीस @NitinNandgaonk3 जी यांनी आज मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. pic.twitter.com/tgVAVpmZmP
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) October 2, 2019
बुधवारी रात्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.वरूण सरदेसाई आणि एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्तीने नांदगावकर यांचा शिवसेनेत प्रवेश झाला. त्यामुळे विधानसेभच्या तोंडावर मनसेला मोठा धक्का बसलाय.
नितीन नांदगावकर हे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र त्यांना मनसेच्या दुसऱ्या यादीतही उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.