पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझम यानी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेगवान शतकांचा नवा विक्रम रचला आहे. आझमने 71 सामने खेळून 11 शतके करण्याचा पराक्रम केला आहे. त्याच्या या विक्रमामुळे भारतीय संघाचा कर्णधार व क्रिकेट विश्वातील सध्या आघाडीचा फलंदाज विराट कोहली याला मागे टाकले आहे.
What a player, what an innings!
Babar Azam reaches his 11th ODI 💯
The first ODI century at the National Stadium since 2009 🙌 pic.twitter.com/FIUEangkG8
— ICC (@ICC) September 30, 2019
सध्या सुरू असलेल्या श्रीलंकेविरुद्ध पाकिस्तानच्या एकदिसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात बाबर आझमने हा विक्रम केला आहे. आझमनं या सामन्यात 115 धावा फटकावल्या. एकदिवसीय कारकिर्दीतील हे त्याचे अकरावे शतक आहे.
कर्णधार विराट कोहलीला 11 शतकांचा टप्पा गाठण्यासाठी 82 डाव खेळावे लागले, तर आझमनी ही कामगिरी अवघ्या 71 डावांमध्ये गाठली. विराटपेक्षा 11 सामने तो कमी खेळला आहे.