महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे खुद्द राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे मनसे निवडणुकांना सामोरे जाणार की नाही या चर्चांना आता पुर्ण विराम मिळाणार आहे. 5 तारखेला राज ठाकरे यांची पहिली प्रचार सभा होणार आहे, असे देखील त्यांनी यावेळी सांगितले. सभेच ठिकण लवकरच जाहिर करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
5 तारखेला “राज” उघडणार
मनसेची पहिली सभा 5 तारखेला होणार असल्याचे खुद्द राज ठाकरे यांनी जाहिर केल्यानंतर आता राज ठाकरे नेमक काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी मनसेचा उमेदवार नसतानाही राज ठाकरे यांनी घेतलेल्या 10 सभा आणि त्यातील लावरे तो व्हिडीओ हे वाक्य चांगलेच गाजले. मात्र इडी चौकशीनंतर राज ठाकरे यांनी आज सोमवार 30 सप्टेंबर रोजी पत्रकारांशी मनसे मेळाव्या दरम्यान संवाद साधला. गेल्या अनेक दिवसांपासून मी शांत होतो. मात्र ते का ? या प्रश्नांना राज ठाकरे उत्तर देणार असल्याचे ही त्यांनी सांगितले. त्यामुऴे आता राज ठाकरे काय बोलणार याकडेच सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
अनेकांचा पक्ष प्रवेश
मुंबईच्या वांद्रयेथील एमआयजी क्लबमध्ये आज 30 सप्टेंबर रोजी मनसेचा मेळावा पार पडला. यावेळी धर्मा पाटील यांचे पुत्र नरेंद्र पाटील. नाशिक सेना नगरसेवक दिलीप दातीर यांनी मनसेत प्रवेश केला. तसेच इतरही अनेक मनसौनिक ,इच्छुक उमेदवार आणि सरचिटणीस यावेऴी उपस्थित होते.