गेल्या कित्येक दिवसांपासून उत्सुकता असलेल्या हाऊसफुल 4 चा ट्रेलर नुकताच रिलीज झालाय. यावेळी चित्रपटाची कथा पुनर्जन्माशी जोडण्यात आली आहे.
ट्रेलर मध्ये मस्ती,विनोद आणि गोंधळ पाहायाला मिळतो. अक्षय कुमार लंडनमध्ये राहणारा एक माणूस आहे, जो 600 वर्षांपूर्वी राजकुमार होता. त्याला त्याच्या मागील जन्माबद्दल सर्व काही आठवते आणि नंतर त्याच्या मित्रांसह एकत्रितपणे, या पुनर्जन्माचे निराकरण कसे करतो आणि त्याचे प्रेम शोधण्याचा प्रयत्न करतो. पूर्वजन्म वर्तमानकाळात होणारे विवाह या गोंधळात अडकलेला तीन नायकांची कथा प्रेक्षकांना खळखळून हसवणारी आहे. हा 26 ऑक्टोबर रोजी चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.
या चित्रपटात अक्षय कुमार, रितेश देशमुख, बॉबी देओल, राणा डग्गुबत्ती, क्रिती सनॉन, पूजा हेगडे अशी भन्नाट स्टारकास्ट तर चित्रपटाच साजिद नाडियाडवाला हे प्रोड्यूसर. ग्रँडसन एंटरटेनमेंट आणि फॉक्स स्टार स्टुडिओजच्या बॅनरखाली नाडियाडवालाची निर्मिती करण्यात आली आहे.