बॉलिवूड मधील प्रसिद्धिस उतरलेला आणि प्रेक्षकांना पुन्हा पुन्हा पाहायला लावणारा हाऊसफुल चित्रपटाचा चौथा भाग म्हणजेच ‘हाउसफुल 4’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकतेच या सिनेमाचे पोस्टर एका मागून एक असे रिलीज केले गेले आहे. अक्षय कुमारने इन्स्टाग्रामवर ‘हाऊसफुल 4’ चे पहिले मोशन पोस्टर शेअर केले आहे, पोस्टरमध्ये 16 व्या शतकाच्या (1419) ते 21 व्या (2019) शतकापर्यंतच्या युगातील प्रवेश दाखवला गेलाय.
Miliye 1419 ke Rajkumar Bala aur 2019 ke London return Harry se! Witness how they embark upon this journey of ultimate chaos, confusion and madness in the #Housefull4 Trailer. Out on 27th September.#SajidNadiadwala @farhad_samji @WardaNadiadwala @foxstarhindi @NGEMovies pic.twitter.com/xmz2OCYzQh
— Akshay Kumar (@akshaykumar) September 25, 2019
स्टारकास्ट
‘हाऊसफुल 4’ हा मल्टीस्टारर सिनेमा आहे. ‘हाऊसफुल 4’ मध्ये अक्षय कुमार, रितेश देशमुख, बॉबी देओल, कृती सेनन, कृती खरबंदा, पूजा हेगडे, चंकी पांडे, राणा डग्गुबाती हे जबरदस्त स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे.
निर्मात्यांनी केला हा दावा
हाऊसफुल फ्रँचायझीचे तीन पार्ट आले असून त्यांना प्रेक्षकांची चांगली पसंती ही मिळाली व या तिन्ही पार्ट्सनी बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई सुद्धा केली. निर्मात्यांकडून असा दावा केला जात आहे की, ‘हाऊसफुल 4’ आधीच्या तीन भागाप्रमाणे जबरदस्त कॉमेडी आणि कथा घेऊन येत आहे. या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियाडवाला यांनी केली असून फराहद समाजी यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.