Ads
मुलाखत

प्रदीप शर्माचे ‘विरोधकांवर’ शाब्दीक एन्काऊटर

pradeep sharma
डेस्क desk team

नालासोपारा विधानसभा मतदार संघातले शिवसेनेचे संभाव्य उमेदवार असलेले एन्काऊटर स्पेशालीस्ट माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी विरोधकांवर चांगलाच हल्लाबोल केला आहे.वसई-विरारमध्ये भ्रष्टाचार माजवल्यांना मी सुखाने झोपू देणार नसल्याचे विधान प्रदीप शर्मा यांनी केले आहे.या विधानावर विरोधक काय प्रतिउत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मला उद्धव ठाकरे यांनी वसई-विरारमधील गुंडशाही मोडून काढण्याचे आवाहन केले होते.तसेच आदित्य ठाकरे यांनी सुद्धा ‘ईट का जवाब पत्थर से दो’ असा सल्ला दिला होता. हा सल्ला घेऊनच मी वसई-विरारमध्ये आल्याचे प्रदीप शर्मा म्हणाले आहेत.

यावेळी वसई-विरार मधल्या समस्यांचा पाढा ही त्यांनी वाचला. येथील घरात पाणी नाही आहे, रस्त्यांवर खडडे, पहिल्या पावसांत रस्ते वाहतात, गुंडगिरी, महिलांवर अत्याचार, लहान मुले खड्ड्यात पडतायत अशा अनेक समस्या आहेत. त्यामुळे या समस्या सोडवून मला नविन नालासोपारा उभारण्यासाठी येथे पाठवण्यात आल्याचा विश्वास शर्मा यांनी व्यक्त केला.

३० वर्षापासून जे स्थानिक सत्ताधारी आहेत, त्यांनी शहरात केलेली परिस्थिती सगळ्यांना माहित आहे. नागरिक भीती सावटा खाली जगतायत, त्यांना हवतस जगता याव यासाठी मी आलोय. तसेच वसई विरारमध्ये ज्यांनी भ्रष्टाचार माजवलाय त्यांना मी सुखाने झोपू देणार नाही अशी शपथ प्रदीप शर्मा यांनी यावेळी घेतली.

About the author

desk team

www. batamidar.com हे स्वतंत्र पत्रकारितेचा पुरस्कार करते. सध्या माध्यमांची दशा आणि दिशा पाहता पत्रकारितेच्या सापेक्ष आणि पारदर्शक मुल्यांवर आम्ही काम करत आहोत. batamidar.com समाजातील दुर्लक्षित , पिडीत ,उपेक्षित घटकांसाठी व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आजच्या Online च्या युगात, वाढते तंत्रज्ञान आणि पत्रकारिता यांची सांगड घालत बातमीदारीचे नवे आयाम तयार करून बातम्यांची फेरमांडणी म्हणजे बातमीदार...

1 Comment

  • प्रदीप शर्माजी छान उद्देश । परंतु आपण ऊत्तर परदेशातून आलात तिथे परिस्थिती उत्तम करून आलात असे समजतो कारण मी तिथे गेलो नाही । परंतु आपण मुंबईतून , अंधेरीतून आलात तिथे रामराज्य आहे वा तुम्ही रामराज्य निर्माण करून आलात असे आम्ही समजू काय, साहेब ।

Leave a Comment

Message Us on WhatsApp
%d bloggers like this: