वसई-विरारमध्ये झोमॅटोचे डिलीव्हरी बॉयज रविवारपासून आपल्या विविध मांगण्यासाठी बेमुदत संपावर गेले आहेत. आज सोमवारीही हा संप कायम असून आपल्या मागण्या मान्य न झाल्यास संप सुरुच राहणार असल्याच पावित्रा या कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.
एका डिलिव्हरी मागे कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मोबदल्यातून 10 रुपये कमी करण्यात आलेत. तसेच या कंपनीच्या सूचनेला मान्य न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात असे मेसेज करण्यात आल्याने हे आंदोलन पुकारण्यात आले आहे.
यावर झोमॅटो कमर्चारी राहुल कदम याच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी विरारच्या विवा कॉलेज परिसरात आंदोलन पुकारत कंपनीसमोर काही मांगण्या ठेवल्या आहेत. कंपनी प्रॉफिटमध्ये असून देखील पे कमी करण्याच कारण काय? तसेच आहे तोच पे म्हणजे डिलिव्हरी मागे 35 रुपये देण्यात यावे.9 डिलिव्हरी नंतर मिळणारा इंसेंटिव्ह कायम ठेवण्यात यावा. रात्री डिलिव्हरी करताना खास सवलती, सुरक्षा याचा कंपनीने विचार करावा अशा काही ठेवण्यात आल्या आहेत.
दरम्यान कंपनीने या मांगण्यावर काहीच विचार ना केल्यास हे आंदोलन असेच कायम राहणार असल्याचे आंदोलक कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे.