वसईत चड्डी बनियन गँगने पुन्हा दहशत माजवायला सुरुवात केली आहे. या संदर्भात माणिकपूर पोलीस हद्दीत एका घटनेदरम्यान ही गँग कॅमेऱ्यात कैद झाली असून परिसरात भीतीचे वातावरण पसरलेय. या गँगच्या मागावर आता माणिकपूर पोलीस आहेत.
वसई पश्चिमेकडील ओम नगर परिसरातील निर्मला सोसायटीमध्ये चड्डी बनियन गॅंगने पहिल्या माळ्यावरील घरातून चोरी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी घरात अभ्यास करणाऱ्या छोट्या मुलीने दरवाजा उघडायचा प्रयत्न केला आणि चड्डी बनियन गॅंगचा चोरीचा प्रयत्न फसला. चोरीची ही घटना सीसीटीव्हीमध्ये पाहायला मिळत आहे. 4 सप्टेंबरला ही घटना घडली होती.
दरम्यान, भीतीदायक बाब म्हणजे चड्डी बनियान गँगकडे धारदार शस्त्र होती. त्यातच याआधीही, चड्डी बनियान गॅंगकडून मुंबईच्या आसपासच्या अनेक भागात दरोड्याच्या घटना घडल्या आहेत पण पोलिस त्यानी पकडण्यात अपयशी ठरले आहेत. तसेच या गॅंगमधील सदस्य पकडले जाण्याच्या भीतीने किंवा अपयशी ठरल्यास खून करण्यास ही घाबरत नाहीत.
सध्या माणिकपूर पोलिस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरांचा शोध घेत असून अधिकच तपास सुरु आहे.