दक्षिण अफ्रिकाविरुध्द सराव सामन्यासाठी भारतीय टीमची घोषणा करण्यात आली. जशी कि सर्वांनाच अपेक्षा होती रोहित शर्माची निवड करण्यात आलीय. यावेळी त्यांच्या खांद्यावर आणखीन एक जबाबदारी असणार आहे. रोहित शर्माला दक्षिण अफ्रिकेविरुध्दच्या प्रॅक्टिस मॅचमध्ये कॅप्टनसी करावी लागणार आहे.
दक्षिण अफ्रिकेविरुध्दच्या प्रॅक्टिस मॅचसाठी भारतीय संघाची घोषणा ही करण्यात आली असून यात या नव्या खेळाडूंना संधी देण्यात आलीय. प्रियांक पांचाल, अभिमन्यु ईश्वरन यांनी डोमेस्टिक सर्किटमध्ये खूप चांगली कामगिरी केली आहे. 26 सप्टेंबरपासून प्रॅक्टिस मॅच खेळवली जाईल.
बोर्ड प्रेसिडेंट इलेवन:
रोहित शर्मा (कॅप्टन), मयंक अग्रवाल, प्रियांक पांचाल, अभिमन्यु ईश्वरन, करुण नायर, सिद्धेश लाड, केएस भारत (विकेट कीपर), जलज सक्सेना, धर्मेंद्र सिंह जडेजा, अवेश खान, इशान पोरेल, शार्दुल ठाकुर, उमेश यादव.